Mumbai: समोर श्वान दिसताच अमित ठाकरे स्टेजवरून उतरले; पुढं जे केलं त्यानं सगळ्यांचं मन जिंकलं, VIDEO

Last Updated:

अमित ठाकरे यांनी या श्वानाला मदत करण्यासाठी लगेचच व्यासपीठावरून उडी घेतली. ते श्वानाच्या जवळ गेले, बाटलीने त्याला पाणी पाजलं.

अमित ठाकरेंचं श्वानप्रेम
अमित ठाकरेंचं श्वानप्रेम
नवी मुंबई, प्रमोद पाटील : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. राज ठाकरे यांनी घरातही श्वान पाळले आहेत. राज घरातील श्वानांना आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच प्रेम करत असतात. त्यांचे आपल्या श्वानांसोबतचे फोटोही अनेकदा समोर येतात. मात्र, आता त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांचंही श्वान प्रेम नुकतंच सर्वांनी अनुभवलं.
त्याचं झालं असं, की शुक्रवारी नवी मुंबईत मनसेच्यावतीने ब्रास बँड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या महोत्सवाला मनसे नेते अमित ठाकरे यांनी भेट दिली. ते आल्याने याठिकाणी मोठी गर्दी झाली. यावेळी एक श्वान गर्दीत अडकला. त्यामुळे प्रयत्न करुनही त्याला बाहेर निघता येईना. याचवेळी अमित ठाकरे यांची नजर गोंधळलेल्या या श्वानावर पडली.
advertisement
अमित ठाकरे यांनी या श्वानाला मदत करण्यासाठी लगेचच व्यासपीठावरून उडी घेतली. ते श्वानाच्या जवळ गेले, बाटलीने त्याला पाणी पाजलं. यावेळी त्यांच्या आसपास अनेक लोक उभा होते, जे त्यांचा व्हिडिओ बनवत होते. अमित ठाकरे यांनी श्वानाला पाणी पाजल्यानंतर त्याच्या पाठीवरून हात फिरवण्यास सुरूवात केली. अमित ठाकरे यांचं हे श्वानप्रेम उपस्थित सर्वांचं मन जिंकणारं होतं.
advertisement
अमित ठाकरे यांनी नंतर या श्वानाची गर्दीतून सुटका केली. यावेळी त्यांची ही कृती अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. आहे. ज्याच्या व्हिडिओ आता समोर आला असून अमित ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: समोर श्वान दिसताच अमित ठाकरे स्टेजवरून उतरले; पुढं जे केलं त्यानं सगळ्यांचं मन जिंकलं, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement