Mumbai : अंधेरी पश्चिम रेल्वे पुलावर घडली धक्कादायक घटना; पोलिसांनी ताबडतोब घेतला कठोर निर्णय
Last Updated:
Mumbai News : अंधेरी रेल्वे पादचारी पूलावर महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी आल्यावर मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. पुलावर फेरीवाल्यांमुळे निर्माण झालेली अडचण आणि सुरक्षा धोका आता दूर करण्यासाठी पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे.
मुंबई : अंधेरी पश्चिम रेल्वेमार्गावरील पादचारी पूलावरुन जाणाऱ्या महिलांसाठी आणि अनेक नागरिकांसाठी पोलिसांनी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अंधेरीतील पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वाचा पादचारी पूल दररोजच्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. येथून दररोज सकाळ-संध्याकाळी नागरिकांची मोठी वर्दळ सुरु असते. त्यातच या पादचारी पुलावर बेकायदेशीर फेरीवाल्यांनी ठाण मांडला होता, ज्यामुळे हा मार्ग खूपच अरुंद झाला होता. यामुळे या ठिकाणी सतत गर्दी होते आणि नागरिकांशी वादावादी देखील घडत असे.
काही वेळा या फेरीवाल्यांमुळे महिलांवर छेडछाड किंवा विनयभंगाच्या घटनाही समोर आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तक्रारींची दखल घेत अंधेरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांनी आपल्या पथकासह येथे विशेष कारवाई केली.
advertisement
पोलिसांच्या कारवाईत पुलावरील सर्व अनधिकृत फेरीवाले हटवण्यात आले. यामुळे नागरिकांना आता पूल मोकळा आणि विनाअडथळा प्रवास करण्याची सुविधा मिळाली आहे. या कारवाईनंतर नागरिकांनीही या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा महत्त्वाचा पादचारी पूल प्रशासनाकडून अखेर अनधिकृत फेरीवाल्यांपासून मुक्त करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर पुलावरुन नागरिक विशेषतहा महिला प्रवासी आता निर्धास्तपणे प्रवास करू शकतात. पोलिसांनी गस्त वाढवल्याने येथील वातावरण आता शांत आणि सुरक्षित बनले आहे. अंधेरीतील हा पूल मुंबईतील पहिला रेल्वे पादचारी पूल ठरला आहे, जो अनधिकृत फेरीवाल्यांपासून मुक्त केला गेला असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 10, 2025 3:03 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : अंधेरी पश्चिम रेल्वे पुलावर घडली धक्कादायक घटना; पोलिसांनी ताबडतोब घेतला कठोर निर्णय


