शालेय शिक्षण आणि अडथळे, मुलींच्या शिक्षणाचा काला घोडा आर्ट फेस्टिव्हल अनोखा संदेश, video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
या ठिकाणी आपल्याला क्राय या संस्थेची कलाकृती देखील पाहायला मिळते. पण या कलाकृतीचे वैशिष्ट्ये म्हणजे ही कलाकृती मुलींच्या शिक्षणाचा संदेश देत आहे.
निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई : सध्या मुंबईमध्ये काला घोडा आर्ट फेस्टिव्हल सुरू आहे. या आर्ट फेस्टिव्हलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कलाकृती पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला क्राय या संस्थेची कलाकृती देखील पाहायला मिळते. पण या कलाकृतीचे वैशिष्ट्ये म्हणजे ही कलाकृती मुलींच्या शिक्षणाचा संदेश देत आहे.
advertisement
लाकडाच्या काट्यांनी उभारलेली ही कलाकृती आहे. या कलाकृतीमध्ये एक मुलगी हातात पुस्तक घेऊन उभी आहे आणि तिच्यासमोर एक उंच झेप घेणारी शिडी आहे. मात्र या शिडीमधील पहिलाच टप्पा म्हणजेच पहिली शिडी या ठिकाणी गायब आहे. म्हणजे मुलींना अनेकदा शालेय शिक्षण घेण्याचे धाडस असते मात्र त्याच्यातील पुढचा टप्पा महाविद्यालयीन शिक्षणाचा टप्पा हा इथे गहाळ आहे.
advertisement
क्राय संस्थेच्या त्रिशा सेठ यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले की, क्राय ही संस्था ही गेल्या 46 वर्षांपासून शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांसाठी कार्य करते. आतापर्यंत आम्ही काला घोडा आर्ट फेस्टिव्हलमध्ये वेगवेगळ्या कलाकृती साकारल्या आहेत. पण यंदा आम्ही मुलींच्या शिक्षणाची कलाकृती साकारली आहे. शालेय शिक्षणानंतर समाजातील वेगवेगळे घटक, आर्थिक परिस्थिती असेल, कुटुंबातील जबाबदारी असतील या सर्व गोष्टींमुळे मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण अनेकदा अपूर्ण राहते किंवा त्यांना महाविद्यालयात जाताच येत नाही. या सर्व गोष्टींचा आढावा या कलाकृतीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
advertisement
1979 ला सुरू झालेल्या या संस्थेला जवळपास 46 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या 46 वर्षात काय या संस्थेने देशभरातील 20 पेक्षा जास्त राज्यांमध्यले जवळपास 50 लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षण या सर्व गोष्टींची देखभाल केली आहे. तसेच या संस्थेचे जवळपास 144 प्रकल्प सुरू आहेत. या सर्वच प्रकल्पांचा मुख्य उद्देश हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे घेऊन जाण्याचा आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 30, 2025 6:55 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
शालेय शिक्षण आणि अडथळे, मुलींच्या शिक्षणाचा काला घोडा आर्ट फेस्टिव्हल अनोखा संदेश, video