Ashok Chavan : भाजप प्रवेशावर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले मी...
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या प्राथमीक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
मुंंबई, प्रतिनिधी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या प्राथमीक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान आता अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण?
मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी पक्षाच्या प्राथमीक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये असताना प्रामाणिकपणे काम केलं. मला कोणबद्दलही काहीही तक्रार नाही. मी कोणावरही नाराज नाही. पुढील राजकीय भूमिका येत्या दोन दिवसांत ठरवणार आहे. दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करणार का? यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की, भाजपची कार्यप्रणाली मला माहिती नाही. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. अन्य पर्याय पाहिले पाहिजे म्हणून मी राजीनामा दिला असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
advertisement
काँग्रेसला मोठा धक्का
दरम्यान काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते मिलींद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. हा काँग्रेससाठी मोठा धक्का होता. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी देखील काँग्रेसचा राजीनामा दिला त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी देखील नार्वेकर यांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. मात्र आपण भाजपमध्ये जाण्याबाबत निर्णय घेतला नसल्यचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता चव्हाण काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 12, 2024 3:21 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ashok Chavan : भाजप प्रवेशावर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले मी...


