Atal Setu Coastal Road: अटल सेतू, कोस्टल रोड थेट विमानतळाला जोडणार, सिडकोचा मास्टर प्लॅन

Last Updated:

Atal Setu-Coastal Road: या प्रकल्पामुळे केवळ रस्ते वाहतूकच नव्हे तर रेल्वे कनेक्टिव्हिटी देखील मजबूत होणार आहे.

Mumbai News: अटल सेतू, कोस्टल रोड थेट विमानतळाला जोडणार, सिडकोचा मास्टर प्लॅन, CRZ ला मंजुरी
Mumbai News: अटल सेतू, कोस्टल रोड थेट विमानतळाला जोडणार, सिडकोचा मास्टर प्लॅन, CRZ ला मंजुरी
मुंबई: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूमुळे महानगरातील प्रवास सुलभ झाला आहे. अशातच आता या सेतूला कोस्टल रोड व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोने घेतला आहे. या निर्णयामुळे उरण, पनवेल, जेएनपीए, नवी मुंबई विमानतळ आणि मुंबई यांच्यातील वाहतूक अधिक वेगवान व सुरळीत होणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत उरण तालुक्यातील गव्हाण गावाजवळील शिवाजीनगर इंटरचेंज येथे सहा रॅम्प उभारण्यात येणार आहेत. अटल सेतूची आखणी होत असताना कोस्टल रोडचे काम सुरू नसल्याने ही जोडणी शक्य नव्हती. मात्र, सिडकोने आता कोस्टल रोडच्या कामाला गती दिल्यामुळे शिवाजीनगर कनेक्टरद्वारे आवश्यक लिंकेज पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या सहा रॅम्पच्या उभारणीसाठी तटीय नियमन क्षेत्र (सीआरझेड) प्राधिकरणाने अटी-शर्तींसह मंजुरी दिली असून प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
advertisement
या प्रकल्पामुळे केवळ रस्ते वाहतूकच नव्हे तर रेल्वे कनेक्टिव्हिटी देखील मजबूत होणार आहे. न्हावा रोड आणि उरण रोडद्वारे हे क्षेत्र आधीच जोडलेले असून या नव्या रॅम्पमुळे खारकोपर रेल्वेस्थानकाची कनेक्टिव्हिटी अधिक प्रभावी होणार आहे. परिणामी, जेएनपीटी, चिर्ले, मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ यांमधील दळणवळणात मोठी सुधारणा होईल.
advertisement
दरम्यान, या प्रकल्पात सुमारे 936 खारफुटी झाडे बाधित होणार असली तरी पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (EIA) अहवालानुसार नुकसान कमी करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत. सुमारे 3.5 हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प राबवला जाणार असून त्यात 32 स्ट्रक्चरल मॉड्यूल्सचा समावेश आहे. प्रत्येकी 75 मीटर लांबीचे हे स्पॅन 1.0 मीटर व्यासाच्या बोर कास्ट-इन-सिटू पाईल्सवर उभारले जाणार असून दीर्घकालीन मजबुतीसाठी खडकात पुरेसे सॉकेटिंग करण्यात येणार आहे.
advertisement
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील नागरिकांसाठी मुंबई व नवी मुंबईकडे जाणे अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित होणार असून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Atal Setu Coastal Road: अटल सेतू, कोस्टल रोड थेट विमानतळाला जोडणार, सिडकोचा मास्टर प्लॅन
Next Article
advertisement
Silver Price : तुफान आलंय...चांदीच्या दरात त्सुनामी, प्रति किलोचा दर ऐकालं तर  डोळे पांढरे होतील, एक्सपर्टने दिला इशारा
तुफान आलंय...चांदीच्या दरात त्सुनामी, प्रति किलोचा दर ऐकालं तर डोळे पांढरे होती
  • सराफा बाजारात चांगलीच उलथापालथ सुरू झाली आहे.

  • सोनं-चांदीच्या दराने उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दराने रेकोर्डब्रेक दर गाठला अ

  • अवघ्या ३८ दिवसांत चांदीच्या दराने एक लाखाची उसळण घेतली

View All
advertisement