Akshay Shinde Encounter : अत्याचार ते एन्काउंटर व्हाया 'आक्रोश'; 12 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर, 43 दिवसात काय घडलं?

Last Updated:

बदलापूरमध्ये खासगी शाळेत १२-१३ ऑगस्टला चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. यातील आरोपी अक्षय शिंदे याचा २३ सप्टेंबरला पोलीस चकमकीत मृत्यू झाला. अक्षय शिंदेने त्याचा गुन्हा कबूल केला होता आणि त्याच्यावर आरोपपत्रही दाखल झालं होतं.

News18
News18
मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी पोलीस चकमकीत मृत्यू झाला. दीड महिन्यापूर्वी अक्षयला लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर दुसऱ्या पत्नीने जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवल्याचे आरोप केले होते. या आरोप प्रकरणी चौकशीसाठी त्याला तळोजा कारागृहातून ठाण्याला नेलं जात होतं. त्यावेळीच अक्षय शिंदेने पोलीसांची रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबाराचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली आणि यात अक्षयचा मृत्यू झाला.
खासगी शाळेत २ चिमुकल्या मुलींवर अत्याचाराच्या घटनेनंतर चार दिवसांनी गुन्हा दाखल झाला होता. तर पाचव्या दिवशी अक्षय शिंदेला अटक झाली होती. मात्र यात पोलिसांकडून हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी करत बदलापूर स्थानकात आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनानंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती.
advertisement
मुलींवर लैंगिक अत्याचार
शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर स्वच्छतागृहात अक्षय शिंदे यानं अत्याचार केला होता. १२-१३ ऑगस्टला ही घटना घडली होती. त्यानंतर या प्रकरणी शाळा प्रशासनाकडेसुद्धा तक्रार करण्यात आली होती.
अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींना त्रास व्हायला लागल्यानंतर याबाबत पालकांना माहिती समजली. त्यांनी वैद्यकीय तपासणी केली असता अत्याचार झाल्याचं उघड झालं. मुलीच्या आईने पोलिसात धाव घेत या प्रकरणी १६ ऑगस्टला तक्रार दाखल केली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.
advertisement
अक्षय शिंदेला अटक
लैंगिक अत्याचार प्रकरणी जेव्हा पोलिसात तक्रार करण्यात आली तेव्हा शाळा प्रशासनाकडून बेजबाबदारपणा झाल्याचंही समोर आलं होतं. पोलिसांनीसुद्धा पीडित मुलींसह त्यांच्या पालकांना बराच वेळ पोलीस ठाण्यात बसवून घेतलं होतं. शेवटी पोलिसांनी 17 ऑगस्टला अक्षय शिंदेला अटक केली होती.
advertisement
शाळेत तोडफोड आणि रेल्वे स्थानकावर आंदोलन
लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी नागरिक संतप्त झाले. नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात गर्दी करत आंदोलन केलं. हे आंदोलन जवळपास ८-१० तास चाललं होतं. या काळात रेल्वेसेवा ठप्प झाली होती.
अक्षय शिंदेविरोधात आरोपपत्र
अक्षय शिंदे हा स्वच्छता कर्मचारी म्हणून शाळेत काम करत होता. त्यानं लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अक्षयला अटक केल्यानंतर महिन्याभराने 19 सप्टेंबरला त्याच्यावर कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.
advertisement
अक्षय शिंदेचा कबुलीजबाब
अक्षय शिंदेने लैंगिक अत्याचार केल्याचा कबुलीजबाब पोलिसांसमोर दिला. राज्य सरकारने स्थापन केल्या एसआयटी चौकशीवेळी त्याचा जबाब कॅमेऱ्यासमोर नोंदवला होता. या प्रकरणी एसआयटीकडून दोन आरोपपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.
अक्षय शिंदेचा एन्काउंटर
अक्षयची तीन लग्नं झाली होती. त्याच्या दुसऱ्या पत्नीने केलेल्या आरोपांप्रकरणी चौकशीसाठी ट्रान्झिट रिमांडवर त्याला ठाण्याला 23 सप्टेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास नेलं जात होतं. तेव्हा अक्षयने पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबाराचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी गोळी झाडली. ही गोळी लागून अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Akshay Shinde Encounter : अत्याचार ते एन्काउंटर व्हाया 'आक्रोश'; 12 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर, 43 दिवसात काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement