आता सायन पुलावरून अवजड वाहनांना बंदी; BEST बसच्या 23 मार्गात बदल!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Piyush Patil
Last Updated:
अंधेरीचा गोखले पूल पडल्यानंतर केलेल्या मुंबईतील ब्रिटिशकालीन आणि जुन्या पुलांच्या तपासणीत सायन रेल्वे स्टेशनवरील पूल जीर्ण अवस्थेत असल्याचं स्पष्ट झालं.
पियुष पाटील, प्रतिनिधी
मुंबई : सायन रेल्वे स्टेशनजवळील 110 वर्षे जुना पूल पाडून त्याची पुनर्बांधणी तसंच पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांचं काम करण्यात येणार आहे. यासाठी पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पुलाचं काम पुढचे 18 महिने सुरू राहील. परिणामी 'बेस्ट'नं बसच्या 23 मार्गांमध्ये बदल केला आहे.
अंधेरीचा गोखले पूल पडल्यानं मुंबईतील ब्रिटिशकालीन आणि जुन्या पुलांची तपासणी भारतीय प्रौद्योगिकी संस्थांद्वारे (आयआयटी) करण्यात आली. त्यात सायन रेल्वे स्टेशनवरील पूल जीर्ण अवस्थेत असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
बेस्ट बसच्या मार्गातील सुधारित बदल:
- 11 मर्यादित ही बस वांद्रे वसाहत, कलानगर मार्गे टी जंक्शन इथून सुलोचना सेठी मार्गानं लोकमान्य टिळक रुग्णालय मार्गे नेव्हीनगर इथं जाईल.
- बस क्रमांक 181, 255 म., 348 म., 355 म. या बस कलानगर मार्गे टी जंक्शन आणि सुलोचना सेठी मार्गानं लोकमान्य टिळक रुग्णालय, राणी लक्ष्मीबाई चौक मार्गे जातील.
advertisement
- बस क्र. ए 376 ही राणी लक्ष्मीबाई चौकातून लोकमान्य टिळक रुग्णालय सुलोचना सेठी मार्गानं बनवारी कॅम्प, रहेजा मार्गे माहिम इथं जाईल.
- सी 305 बस धारावी आगारातून पिवळा बंगला टी जंक्शन आणि सेठी मार्गानं टिळक रुग्णालयापासून बॅकबे आगार इथं जाईल.
- बस क्र. 356 म., ए 375 आणि सी 505 या बस कलानगर बीकेसी कनेक्टरहून प्रियदर्शनी इथं जातील.
advertisement
- बस क्र 7 म., 22 म., 25 म. आणि 411 या बस महाराष्ट्र काटा, धारावी आगारहून पिवळा बंगला टी जंक्शन आणि सुलोचना सेठी मार्गानं लोकमान्य टिळक रुग्णालय मार्गे जातील.
- बस क्र. 312 आणि ए 341 या बस महाराष्ट्र काटा, धारावी आगारहून टी जंक्शन आणि सेठी मार्गानं राणी लक्ष्मी चौक इथून जातील.
advertisement
- बस क्र. एसी 72 भाईंदर स्थानक ते काळा किल्ला आगार आणि सी 302 ही बस मुलुंड बस स्थानक ते काळा किल्ला आगार इथं खंडित करण्यात येईल.
- बस क्र. 176 आणि 463 या बस काळा किल्ला आगार इथून सुटतील आणि शिव स्थानक 90 फूट मार्गानं लेबर कॅम्प मार्गानं दादर माटुंगा स्थानकाकडे जातील.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 03, 2024 12:55 PM IST