BEST Bus : नवी मुंबई अन् उरणहून बेस्टची थेट बस सेवा सुरू; कसा असेल रूट?
Last Updated:
New Best Route Uran-Navi Mumbai : उरण आणि नवी मुंबईकरांसाठी बेस्टची थेट बससेवा सुरू झाली असून या सेवेसाठी आधीच ऑनलाइन नोंदणी आवश्यक केली आहे. मात्र जाणून घ्या या बसेसचा मार्ग कसा असणार आहे?
नवी मुंबई : उरण- नवी मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. जी की आता या शहरातील नागरिकांना बेस्टची थेट बससेवा मिळणार आहे. मात्र, ही बस कोणकोणत्या मार्गांवरून धावणार आहे, कोणते थांबे असतील आणि प्रवाशांना तिकिटे कशी मिळणार याची संपूर्ण माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
जाणून घ्या संपूर्ण माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, द्रोणागिरी नोडपासून मुंबईपर्यंत ही बससेवा 14 तारखेपासून सुरू करण्यात आली आहे. मात्र या बसमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी अॅडव्हान्समध्येच ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी केलेल्या प्रवाशांनाच बसमध्ये प्रवास करता येणार आहे.
उरण परिसराला मागील काही वर्षांत वाढते महत्त्व मिळत आहे कारण त्या ठिकाणी असलेले विविध आंतरराष्ट्रीय बंदरे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि उरण परिसरात सुरू होणारे अनेक प्रकल्प यामुळे या भागातील औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
advertisement
ही बससेवा का सुरु झाली?
या दोन शहरात लोकसंख्या आणि प्रवासाची गरज वाढल्याने लालपरी, नवी मुंबई परिवहन सेवा आणि रेल्वेची सध्याची सुविधा अपुरी पडत आहे. रेल्वेने उरणपर्यंत सेवा सुरू केली असली तरी मुंबईपर्यंत थेट लोकल अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना मुंबईत जाण्यासाठी पर्यायी प्रवासव्यवस्थांची गरज होती.
हीच गरज लक्षात घेऊन बेस्टने द्रोणागिरी-ते-मुंबई अशी थेट बससेवा सुरू केली आहे. या सेवेचा लाभ घेतल्यास उरणकरांना मुंबईशी जोडणारा आणखी एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे. आता नोकरी, शिक्षण आणि दैनंदिन कामांसाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या बससेवेचा मोठा फायदा होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 10:38 AM IST


