IND vs PAK : पाकिस्तानला 'सपोर्ट' करणं भिवंडीच्या तरुणाला भोवलं, अटकेनंतर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Last Updated:

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असतानाच पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट करणं भिवंडीच्या तरुणाला चांगलंच भोवलं आहे.

पाकिस्तानला 'सपोर्ट' करणं भिवंडीच्या तरुणाला भोवलं, अटकेनंतर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
पाकिस्तानला 'सपोर्ट' करणं भिवंडीच्या तरुणाला भोवलं, अटकेनंतर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
भिवंडी : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या 9 दहशतवादी ठिकाणांवर मिसाईल डागली. भारताच्या या कारवाईनंतर खवळलेल्या पाकिस्ताननेही भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय लष्कराने पाकिस्तानचे सगळे प्रयत्न हाणून पाडले. दुसरीकडे पाकिस्तानमधील इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडी आणि कराचीमध्ये ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत.
एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असतानाच भिवंडीमधील एका तरुणाने पाकिस्तानचं समर्थन केलं होतं. या तरुणाला भिवंडी शहर पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडी शहरातील घुंगट नगर परिसरात राहणाऱ्या अफसर अली अजगर अली शेख या 18 वर्षांच्या तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम आयडीवर स्टेटस म्हणून पाकिस्तानला सपोर्ट केल्यामुळे या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
advertisement
या तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम स्टेटसवर 'चाहे जो हो जाये सपोर्ट तो बस पाकिस्तान को करेंग' असं लिहिलं होतं. तरुणाच्या या स्टेटसवरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर भिवंडी शहर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या तरुणाच्या विरोधात बीएनएस कलम 152 अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली.
advertisement

'सहन करणार नाही'

'सोशल मीडियावर देशविरोधी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत. याप्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे', असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे म्हणाले. भिवंडी पोलिसांची ही कारवाई सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून राष्ट्रविरोधी पोस्ट करणाऱ्यांना कठोर संदेश म्हणून पाहिलं जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
IND vs PAK : पाकिस्तानला 'सपोर्ट' करणं भिवंडीच्या तरुणाला भोवलं, अटकेनंतर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement