Mumbai Traffic : मुंबईकर लक्ष द्या! वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीत मोठे बदल, गैरसोय टाळण्यासाठी पाहा पर्यायी मार्ग

Last Updated:

Western Express Highway : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. प्रवासाला निघण्यापूर्वी पर्यायी मार्ग तपासा अन्यथा वाहतूक कोंडीत अडकाल.

News18
News18
मुंबई : मुंबई शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आजपासून वेस्टर्न एक्सप्रेस हाईवेवर वाहतूकीत मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून प्रवास करताना कोणते मार्ग बंद तसेच पर्यायी मार्ग कोणते,याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊन बाहेर पडावे.
वाहतुक बदलाचे कारण काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या या भेटीमुळे शहरात विशेष वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. आज दुपारी सुमारे 4 वाजता मोदी गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये होणाऱ्या ‘इंडिया मेरीटाईम वीक (IMW) 2025’ मधील मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला संबोधित करणार आहेत. याच कार्यक्रमात ते ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचे अध्यक्षस्थान स्वीकारतील. हा सागरी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार असून देश-विदेशातील विविध हितधारक आणि तज्ज्ञ यात सहभागी होणार आहेत.
advertisement
जोगेश्वरी–गोरेगाव परिसरात तात्पुरते वाहतूक निर्बंध
या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी जोगेश्वरी–गोरेगाव परिसरात तात्पुरते वाहतूक निर्बंध आणि मार्गबदल लागू केले आहेत. हे निर्बंध 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान दररोज सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत लागू राहतील, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या भागात असणार नो-एंट्री क्षेत्र
मोदींच्या भेटीदरम्यान सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रणासाठी खालील मार्गांवर प्रवेशबंदी लागू केली आहे:
advertisement
1)मृणालताई गोरे जंक्शन ते नेस्को गॅप या दरम्यान सर्वसाधारण वाहनांना प्रवेश बंद.
2)फक्त आपत्कालीन सेवा वाहने, व्हीआयपी ताफे आणि स्थानिक रहिवासी यांनाच परवानगी.
3)राम मंदिर रोडमार्गे मृणालताई गोरे जंक्शनवरून नेस्को गॅपकडे जाणारे उजवे वळण पूर्णतः बंद.
4)हब मॉल ते जयकोच (नेस्को) जंक्शन दरम्यानचा सर्व्हिस रोडही वाहतुकीसाठी बंद राहील.
या भागात असेल एकेरी वाहतूक
नेस्को गॅप ते मृणालताई गोरे जंक्शन हा मार्ग आता एकेरी वाहतुकीसाठी खुला असेल.
advertisement
पर्यायी मार्ग कोणते असतील?
1)राम मंदिर दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी- मृणालताई गोरे फ्लायओव्हर – महानंदा डेअरी (साउथ सर्व्हिस रोड) – जयकोच चौक – जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) चौक हा मार्ग वापरावा.
2)JVLR वरून येणाऱ्यांसाठी-पवईकडे जाता येईल किंवा पश्चिम द्रुतगती महामार्गावर (WEH) जाण्यासाठी सर्व्हिस रोडमार्गे मुख्य मार्गावर प्रवेश घेता येईल.
नो पार्किंग क्षेत्रे
1. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजू)
advertisement
2. नेस्को सर्व्हिस रोड
3. घास बाजार रोड
4. ट्रॉमा केअर हॉस्पिटल सर्व्हिस रोड
5. महानंदा डेअरीसमोरील सर्व्हिस रोड
6. वनराई पोलिस स्टेशन सर्व्हिस रोड
7. निरलॉन कंपनी सर्व्हिस रोड
8. अशोक नगर सर्व्हिस रोड
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Traffic : मुंबईकर लक्ष द्या! वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीत मोठे बदल, गैरसोय टाळण्यासाठी पाहा पर्यायी मार्ग
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement