BMC Elections : राज ठाकरेंचा कट्टर मोहरा फुटला, CM फडणवीसांना भेटला, मुंबईच्या बालेकिल्ल्यात मनसेला खिंडार

Last Updated:

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरेंच्या कट्टर मनसैनिकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे.

राज ठाकरेंचा कट्टर मोहरा फुटला, CM फडणवीसांना भेटला, मुंबईच्या बालेकिल्ल्यात मनसेला खिंडार
राज ठाकरेंचा कट्टर मोहरा फुटला, CM फडणवीसांना भेटला, मुंबईच्या बालेकिल्ल्यात मनसेला खिंडार
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. मनसेचे नेते आणि कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जाणारे संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. कट्टर मनसैनिक म्हणून ओळखल्या जाणार्या मनसेच्या जय-वीरूची जोडी फुटली का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
संतोष धुरींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. भाजप नेते नितेश राणे यांच्या पुढाकाराने संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

संतोष धुरी मनसेमध्ये नाराज

मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 192 आणि 194 या दोन जागांवरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना युबीटी आणि मनसेमध्ये वाद होता. पण या वादावर तोडगा काढत वॉर्ड क्रमांक 192 हा मनसे पक्षाकडे तर वॉर्ड क्रमांक 194 हा ठाकरेंच्या शिवसेनेला युतीमध्ये सोडण्यात आला. पण मनसेकडून वॉर्ड क्रमांक 194 मधून माजी नगरसेवक संतोष धूरी निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण आता हा वॉर्ड जागा वाटपात ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटल्यामुळे संतोष धुरी नाराज झाले, तसंच ते काही काळ नॉट रिचेबल झाल्याचीही चर्चा होती.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Elections : राज ठाकरेंचा कट्टर मोहरा फुटला, CM फडणवीसांना भेटला, मुंबईच्या बालेकिल्ल्यात मनसेला खिंडार
Next Article
advertisement
Neil Somaiya Dinesh Jadhav : सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगितली Inside Story
सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगि
  • बीएमसी वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली.

  • नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे वाटत असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने

  • ठाकरेंनी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करून सोमय्यांसमोर

View All
advertisement