Currency : तुम्ही कधी पाहिलीय का अडीच रुपयांची नोट? 'या' नोटीला का मिळतोय लाखोंचा भाव?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आजच्या काळात आपण 10, 20, 100 आणि 500 च्या नोटा पाहतो. पण भारतीय चलनाच्या इतिहासात अशाही काही नोटा होत्या, ज्यांचा विचार आज आपण करू शकत नाही.
advertisement
advertisement
झारखंडमधील हजारीबाग येथे एक अशी गॅलरी आहे, जिथे भारतीय चलनाचा इतिहास जिवंत झालेला पाहायला मिळतो. या गॅलरीचे मालक जैन यांना जुनी नाणी आणि नोटा गोळा करण्याचा प्रचंड छंद आहे. त्यांच्या या संग्रहातील सर्वात अनमोल ठेवा म्हणजे ब्रिटिश काळातील अडीच रुपयांची नोट. या गॅलरीमुळे हे सिद्ध झाले आहे की, जर तुमच्याकडे योग्य पारख असेल, तर जुन्या नोटा तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळवून देऊ शकतात.
advertisement
advertisement
छापाई आणि बंदी: ही नोट 1992 च्या दशकात छापली गेली होती. मात्र, ती फार कमी काळ चलनात राहिली आणि 1926 मध्ये ही नोट बंद करण्यात आली. यामुळेच आज ही नोट अत्यंत दुर्मिळ (Rare) मानली जाते. सध्याच्या लिलावामध्ये (Auctions) या अडीच रुपयांच्या नोटेची बोली तब्बल 6.40 लाख रुपयांपर्यंत लावली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, ही केवळ कागदाची नोट नसून ब्रिटिशकालीन आर्थिक इतिहासाचा एक जिवंत पुरावा आहे.
advertisement
advertisement
एक रुपयाची नोट आणि 7 लाखांची कमाई?भारतात सध्या 'न्यूमिस्मॅटिक्स' (Numismatics - नाणी आणि चलनांचा अभ्यास) या विषयात रस वाढतोय. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत जिथे साधी 1 रुपयाची जुनी नोट 7 लाखांपर्यंत विकली गेली आहे. तर '786' सारखे फॅन्सी नंबर असलेल्या नोटांची किंमत तर कोटींच्या घरात जाते. त्यामुळे, जर तुमच्याकडे किंवा तुमच्या पूर्वजांच्या संग्रहात अशा जुन्या नोटा असतील, तर त्या फेकून देऊ नका. त्यांची किंमत तपासा, कदाचित तुमच्याकडेही एखादा 'अनमोल ठेवा' दडलेला असू शकतो.











