Mumbai Traffic : मुंबईतील वाहतूक कोंडी फुटणार, राबविण्यात येणार नवीन प्रकल्प, असा आहे महापालिकेचा मास्टर प्लॅन
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
या सतत वाढणाऱ्या समस्येवर उपाय म्हणून अनेक प्रयोग करण्यात आले आणि आता ‘अॅक्सेस कंट्रोल प्रकल्प’ या नव्या योजनेने या समस्येवर दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई: मुंबई म्हटलं की वाहतूक कोंडी हा प्रश्न टाळताच येत नाही. गर्दीच्या वेळी लांबच लांब वाहनांच्या रांगा, हॉर्नचा आवाज, अपघातांचा धोका या सगळ्यामुळे प्रवाशांना अनेकदा तासन्तास रस्त्यावर अडकून राहावं लागतं. या सतत वाढणाऱ्या समस्येवर उपाय म्हणून अनेक प्रयोग करण्यात आले आणि आता ‘अॅक्सेस कंट्रोल प्रकल्प’ या नव्या योजनेने या समस्येवर दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांवरील (Eastern आणि Western Express Highway) सर्वाधिक कोंडीच्या ठिकाणी अंडरपास आणि उड्डाणपूल बांधून वाहतूक सुलभ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
प्रकल्प कुठे राबवला जाणार आहे?
मुंबई महापालिकेच्या या योजनेअंतर्गत सुरुवातीला नऊ ठिकाणांवर अॅक्सेस कंट्रोल रस्ता करण्याचा विचार होता. मात्र, सध्या चार महत्त्वाच्या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे:
advertisement
सांताक्रुझ – मिलन सबवे परिसर
विलेपार्ले – मारुती मंदिर (हनुमान रोड)
बोरिवली – सुधीर फडके रोड
पूर्व द्रुतगती मार्ग – अण्णा भाऊ साठे पुलाखाली
यापैकी अण्णा भाऊ साठे पुलाखालील काम सुरू झाले आहे, तर पश्चिमेकडील तिन्ही ठिकाणांवर लवकरच कामास सुरुवात होणार आहे.
Pune Weather : पश्चिम महाराष्ट्रातील हवामान मोठे बदल, आज दुहेरी संकट, हवामान खात्याने दिला अलर्ट
advertisement
‘बॉक्स पुशिंग टेक्नॉलॉजी’ म्हणजे काय?
या प्रकल्पात सर्वात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे ती ‘बॉक्स पुशिंग टेक्नॉलॉजी’ ची. या पद्धतीत आधीच तयार केलेले आरसीसी (RCC) बॉक्स मोठ्या यंत्रांच्या साहाय्याने जमिनीत पुढे ढकलले जातात. बॉक्स सरकत असताना त्यातील माती बाहेर काढली जाते, त्यामुळे वरचा रस्ता कायम खुला राहतो आणि वाहतूक थांबत नाही.
म्हणजेच, वाहनांचा प्रवास सुरू असतानाच भूमिगत मार्ग तयार होतो. ही पद्धत पूर्वी काही रेल्वे अंडरपास प्रकल्पांमध्ये यशस्वी ठरली असून, आता ती शहरातील द्रुतगती मार्गांवर वापरण्याचा विचार आहे.
advertisement
वाहतूक सुरळीत करण्याचा उद्देश
पूर्व आणि पश्चिम एक्सप्रेस हायवेसवर गर्दीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. त्यामुळे चालक आणि प्रवाशांना त्रास होतो तसेच अपघातांचं प्रमाणही वाढतं.
या पार्श्वभूमीवर महापालिकेचं उद्दिष्ट म्हणजे
गर्दीच्या ठिकाणी उड्डाणपूल, अंडरपास निर्माण करणे, वाहतूक सुलभ करणे, प्रवासाचा वेळ कमी करणे, आणि अपघातांमध्ये घट आणणे.
या तंत्रज्ञानावर आणि अंमलबजावणीच्या आराखड्यावर ‘आयआयटी मुंबई’ कडून अभ्यास अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानुसार पुढील टप्प्यात प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 10, 2025 9:22 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Traffic : मुंबईतील वाहतूक कोंडी फुटणार, राबविण्यात येणार नवीन प्रकल्प, असा आहे महापालिकेचा मास्टर प्लॅन


