Chhatrapati Sambhajinagar : 12 दिवसांपासून काहीच जाणलं नाही, मात्र शेतातून येणाऱ्या दुर्गंधीचा मागोवा घेतला अन् समोर आलं थरकाप उडवणारं दृश्य
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Shocking Crime News: छत्रपती संभाजीनगरमधून दोन धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत. जिथे दोन ठिकाणी जे घडलं ते पाहून प्रत्येकजण हैराण झालेला आहे. जाणून घ्या कशासंबंधित घटना घडलेल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रालगतच्या भागात दोन वेगवेगळ्या गळफासाच्या घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. एका घटनेत नांदेडा शिवारात पळसाच्या झाडाला 12 दिवसांपूर्वी गळफास घेतलेल्या अनोळखी व्यक्तीचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. दुसऱ्या घटनेत विटावा येथे 19 वर्षांच्या तरुणाने घरातील हुकाला गळफास लावून जीवन संपवले.
नेमकं घडलं तरी काय?
नांदेडा गावालगतच्या शेतवस्ती भागात शुक्रवारी (7 नोव्हेंबर) सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. तूर पिकावर फवारणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला दुर्गंधी येऊ लागल्याने त्याने झाडाजवळ पाहिले असता एक व्यक्ती दोरीच्या साहाय्याने पळसाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आली.
मृतदेहची अवस्था पाहता हा प्रकार दहा ते बारा दिवसांपूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परिसर निर्मनुष्य असल्याने हा प्रकार इतके दिवस निदर्शनास आला नव्हता. माहिती मिळताच पोलिस कर्मचारी विश्वास मुंडे आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयात पाठविला. अद्यापही मृताची ओळख पटलेली नसून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
advertisement
दुसरी घटना घडली तरी कुठे?
view commentsदुसरी घटना विटावातील शितलनगर परिसरात घडली. येथील रहिवासी असलेल्या प्रीतम साईनाथ कर्डिले (वय 19) याने शुक्रवारी सायंकाळी 6 च्या सुमारास घरातील सिलिंगला असलेल्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही बाब लक्षात येताच ऋषिकेश मुळे आणि बद्रीनाथ बोराडे यांनी त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांनी वाळूज परिसर सुन्न झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 10, 2025 9:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Chhatrapati Sambhajinagar : 12 दिवसांपासून काहीच जाणलं नाही, मात्र शेतातून येणाऱ्या दुर्गंधीचा मागोवा घेतला अन् समोर आलं थरकाप उडवणारं दृश्य


