Mhada Lottery 2024 : म्हाडाचं घर विकता किंवा भाड्याने देता येईल का?, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं, फक्त एका क्लिकवर..

Last Updated:

Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या लॉटरीत घर मिळाल्यानंतर काहींना काही कारणास्तव घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे घर घेताना सर्व नियम आणि अटी समजून घेणे गरजेचे आहे. घर विकण्याची नेमकी नियमावली काय आहे, हे आपण पाहूयात.

म्हाडा लॉटरी 2024
म्हाडा लॉटरी 2024
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : म्हाडाकडून मुंबई आणि ठाणे या शहरात तब्बल 11000 घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. लवकरच यासाठीची प्रक्रिया सुरू होणार आहे. पण म्हाडाच्या लॉटरीची घोषणा झाल्यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न येत आहे. आपल्याला घर मिळाल्यावर ते घर भाड्याने देता येईल का? किंवा ते विकले जाऊ शकते का? असे प्रश्न अनेकांना पडत आहेत. त्यामुळे आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
advertisement
म्हाडाच्या लॉटरीत (Mhada Lottery) घर मिळाल्यानंतर काहींना काही कारणास्तव घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे घर घेताना सर्व नियम आणि अटी समजून घेणे गरजेचे आहे. म्हाडाचे घर विकण्याची किंवा भाड्याने देण्याची नेमकी नियमावली काय आहे, हे आपण पाहूयात.
अशी आहे घर विकण्याची नियमावली (Rules for MHADA property sale) -
म्हाडाचे घर मिळाल्यास नियमानुसार 5 वर्षे ते घर विकता येत नाही. 5 वर्षांत हे घर विकण्याचा प्रयत्न केल्यास घरांची नोंदणी किंवा घराच्या नावावर नोंदणी होत नाही. यामध्ये हे घर विकण्यासाठी तुम्हाला म्हाडाकडून एनओसी घ्यावी लागेल. घराचा ताबा मिळाल्याच्या तारखेपासून 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच म्हाडाकडून ही एनओसी जारी केली जाते.
advertisement
काही ठिकाणी एजंटच्या मदतीने ही घरे सर्रास विकली जातात. ‘म्हाडा’लाही याची कल्पना आहे. मात्र, हे करताना तुमची फसवणूक झाली, तर या फसवणुकीचा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे 5 वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हाडाचे घर विकण्याचा विचार करू नका.
advertisement
म्हाडाचे घर भाड्याने देता येईल का? (Can MHADA House be rented?)
आता म्हाडाची घरे 5 वर्षे विकता येत नसतील तर ती भाड्याने देता येतील का? असा प्रश्नदेखील अनेकांना पडला असेल. म्हाडाने 2 वर्षांपासून घरे भाड्याने देण्यासाठी काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. या अटी व शर्तींच्या अधीन राहून म्हाडा रीतसर परवानगी देते. म्हाडाच्या लॉटरीनंतर हे घर लगेच तुम्ही भाड्याने देऊ इच्छित असाल तर तुम्हाला त्यासाठी म्हाडाकडे अर्ज सादर करावा लागेल. त्या अर्जात तुमच्या घराची माहिती देऊन तुम्हाला घर भाड्याने का द्यायचे आहे? त्याची सविस्तर माहिती द्यावी लागेल. काही कारणास्तव तुम्ही त्या ठिकाणी राहू शकणार नाही, असे या अर्जात तुम्हाला म्हाडाला पटवून द्यावे लागेल.
advertisement
म्हाडाच्या घरासाठी कोणती कागदपत्रे लागतात, आधीच्या तुलनेत प्रक्रिया झाली सोपी, असा करा कर्ज...
त्यानंतर हे पत्र तुम्हाला एनओसीसाठी म्हाडाकडे जमा करावे लागेल. यानंतर तुम्हाला म्हाडाकडून एनओसी मिळवण्यासाठी 1 वर्षासाठी म्हाडाला 3 हजार ते 5 हजार रुपये भरावे लागतील. तुम्हाला तुमच्या भाडेकरूबद्दल म्हाडाला कळवावे लागेल, त्यानंतर तुम्हाला एनओसी मिळेल.
म्हाडा अर्ज भरण्यासाठी नेमके काय करावे (How to apply for MHADA housing lottery?)
ही प्रक्रिया 1 वर्षासाठी आहे. 1 वर्षानंतर तुम्हाला ही प्रक्रिया पुन्हा करावी लागेल आणि 1 वर्षाची फी भरावी लागेल. आता जर काहींना दरवर्षी ही प्रक्रिया करणे शक्य नसेल तर तुम्हाला 3 वर्षांसाठी एनओसी मिळू शकते. मात्र, तुम्हाला 3 वर्षांसाठी खूप पैसे द्यावे लागतील. एक वर्षाचा विचार केला तर ईडब्ल्यूएस (EWS) घरांसाठी 2000, एलआयजी (LIG) घरांसाठी 3000, एमआयजी (MIG) घरांसाठी 4000 आणि एचआयजी (HIG) घरांसाठी 5000 रुपये द्यावे लागतील. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमचे घर भाड्याने देऊ शकाल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mhada Lottery 2024 : म्हाडाचं घर विकता किंवा भाड्याने देता येईल का?, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं, फक्त एका क्लिकवर..
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement