म्हाडाच्या घरासाठी कोणती कागदपत्रे लागतात, आधीच्या तुलनेत प्रक्रिया झाली सोपी, असा करा कर्ज...
- Published by:Khushalkant Dusane
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
आता म्हाडाने लोकांच्या याच समस्येला हेरून कागदपत्रांची संख्या 21 वरून कमी करून केवळ 6 कागदपत्रांवर आणली आहे. ॲपच्या मदतीने ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार आहे. त्यामुळे नक्की कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत, हे जाणून घेऊयात.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : म्हाडाकडून मुंबई आणि ठाण्यातील घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहेत. तब्बल 11000 घरांची ही सोडत असणार आहे. ज्या ज्या वेळी म्हाडाच्या घरांची लॉटरी निघते, त्यावेळी कित्येक लोक यासाठी अर्ज करतात. पण बऱ्याच वेळा ‘म्हाडा’च्या योजनेतून घर घेताना कागदपत्रांची यादी पाहूनच सर्वसामान्य अर्ज करत नाहीत. आता म्हाडाने लोकांच्या याच समस्येला हेरून कागदपत्रांची संख्या 21 वरून कमी करून केवळ 6 कागदपत्रांवर आणली आहे. ॲपच्या मदतीने ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार आहे. त्यामुळे नक्की कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत, हे जाणून घेऊयात.
advertisement
पूर्वी अर्ज भरताना 21 कागदपत्र जोडणे अनिवार्य होते. त्यासोबतच कागदपत्रांच्या पडताळणीचे कामही मानवी पद्धतीने होत होती. यामध्ये प्रदीर्घ काळ जात होता त्यामुळे मनस्तापाने अनेक सामान्य लोक अर्ज भरायचेत नाहीत. याचा परिणाम म्हाडाच्या घरांच्या खरेदीवर होऊ लागला व म्हाडाची घरे रिकामी राहत असल्याचे निरीक्षणातून समोर आले. त्यामुळेच तर आता म्हाडाने ही सर्व प्रक्रिया एका ॲपद्वारे आणि कमी कागदपत्रांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
अशी आहे ही नवीन प्रक्रिया -
म्हाडाच्या नव्या पद्धतीनुसार अर्जदाराची पात्रता आता सोडतीपूर्वीच ऑनलाईन पद्धतीने तपासली जाईल. यासाठी केवळ 6 कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. अर्जदाराच्या अर्जाची जलद आणि अचूक पडताळणी करण्यासाठी ही प्रक्रिया तयार करण्यात आली आहे. अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे आता डीजी लॉकरमध्ये सुरक्षित राहतील आणि सोडतीनंतर निकाल एसएमएस, ई-मेलद्वारे आणि ॲपमध्ये तत्काळ उपलब्ध करून दिला जाईल.
advertisement
म्हाडाच्या लॉटरीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे -
- ओळखपत्र पुरावा - आधारकार्ड, आधारकार्डवरील पत्ता हा सध्याच्या पत्त्यापेक्षा वेगळा असल्यास अर्जदाराने सध्याचा पत्ता नमूद करणे गरजेचे आहे.
- पॅनकार्ड.
- महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र - तहसीलदार यांनी दिलेले चालू पाच वर्षांमधील अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्यावर क्यूआर कोड देखील आवश्यक आहे.
- स्वतःच्या उत्पन्नाचा पुरावा - प्राप्तिकर परतावा प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा विवाहित असल्यास- पती/पत्नीच्या उत्पन्नाचा पुरावा पती/पत्नीचे प्राप्तिकर परतावा प्रमाणपत्र (नोकरी असल्यास) किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागेल.
- जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र, तसेच इतर प्रवर्गानुसार प्रमाणपत्र.
- स्वघोषणापत्र.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 02, 2024 5:20 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
म्हाडाच्या घरासाठी कोणती कागदपत्रे लागतात, आधीच्या तुलनेत प्रक्रिया झाली सोपी, असा करा कर्ज...