मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यामुळे अचानक पोलीस भरती रद्द, विद्यार्थ्यांचे हाल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?

Last Updated:

या मैदानी चाचणीसाठी खूप दूरवरून विद्यार्थी आले होते. मात्र, विद्यार्थ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानक आजची मैदानी चाचणी रद्द करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

+
छत्रपती

छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचे हाल

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाकडून पोलीस भरती घेण्यात येत आहे. आज छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये दिनांक 2 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी घेण्यात येणार होती. मात्र, अचानक ही चाचणी रद्द करण्यात आली आणि यामुळे अनेक विद्यार्थ्यांची फजिती झाली आहे. विद्यार्थ्यांना मानसिक ताणही यामुळे सहन करावा लागत आहे. याबाबत लोकल18 च्या टीमने विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये दौरा होता. या दौऱ्यामुळे मनुष्यबळ कमी पडते, असे कारण सांगून पोलीस भरतीची मैदानी चाचणी रद्द करण्यात आली. या मैदानी चाचणीसाठी खूप दूरवरून विद्यार्थी आले होते. मात्र, विद्यार्थ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानक आजची मैदानी चाचणी रद्द करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हालदेखील होत आहेत. याठिकाणी कुठली सुविधा नाही. तसेच पाऊस पडत आहे. यामुळे देखील विद्यार्थी त्रस्त आहेत.
advertisement
मी अकोलावरून या ठिकाणी आलो आहे. माझे वडील हे शेतात काम करतात आणि इथे येण्यासाठी 2 ते 3 हजार रुपये एवढा खर्च येतो. दरवेळेस एवढे पैसे कुठून आणायचे. मागच्या दोन वेळेस सुद्धा असेच कारण सांगून आमची चाचणी पुढे ढकलण्यात आली होती. या वेळेसदेखील आमची चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. आम्हाला याची कुठलीही पूर्वकल्पना दिली नव्हती. कुठलाही एसएमएस किंवा मेल देखील यांनी पाठवलेला नाही. तसेच याठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही, झोपण्यासाठी जागा देखील नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आमची चाचणी लवकरात लवकर घ्यावी, या शब्दात अभिषेक म्हात्रे नावाच्या एका पोलीस भरतीच्या उमेदवाराने आपल्या भावना व्यक्त केल्या.
advertisement
बांबू लागवडीसाठी मिळणार 7 लाखांचे अनुदान, विक्रीसाठी मार्केटही उपलब्ध होणार, नेमका कुठे अर्ज करावा?
मी यवतमाळवरून आलो आहे. याआधीही दोन वेळासुद्धा असेच कारण सांगून आमची भरती रद्द करण्यात आली. इतक्या लांब येण्यासाठी 8 ते 9 तास लागतात. त्यासोबतच इथे राहण्याची सुविधा नाही. जेवणाचीदेखील सुविधा नाही. आम्ही इथं ग्राउंडच्या बाहेर झोपलो आहोत. आता आम्ही कसे करायचे, आम्हाला कल्पनादेखील दिली नव्हती. हे अत्यंत चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया सत्यपाल जाधव या तरुणाने दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यामुळे अचानक पोलीस भरती रद्द, विद्यार्थ्यांचे हाल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement