Toll Policy: टोलची कटकट कायमची मिटणार, गडकरी मोठ्या निर्णयाच्य तयारीत, थेट प्लॅनच सांगितला..

Last Updated:

Toll Policy: देशातील टोलची कटकट कायमची मिटणार आहे. केंद्र सरकार लवकरच नवीन धोरण आणणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिलीये.

Toll Policy: टोलची कटकट कायमची मिटणार, गडकरी मोठ्या निर्णयाच्य तयारीत, थेट प्लॅनच सांगितला..
Toll Policy: टोलची कटकट कायमची मिटणार, गडकरी मोठ्या निर्णयाच्य तयारीत, थेट प्लॅनच सांगितला..
मुंबई: टोलनाक्यावर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरूच असतात. त्यासाठी पैसे देणे आणि घेण्याची व्यवस्था बंद करून फास्टॅग प्रणाली सुरू करण्यात आली. तरीही टोलनाक्यावर गाड्यांना उभंच राहावं लागतंय. त्यामुळे केंद्र सरकार लवकरच टोल नाके बंद करून नवी यंत्रणा विकसीत करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीच माहिती दिलीये. मुंबईत दादरच्या अमर हिंद मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते.
15 दिवसांत नवी पॉलिसी
“टोलबद्दल मी जास्त सांगणार नाही. पण 15 दिवसांच्य आत अशी पॉलिसी येईल, ज्यामुळं टोलबद्दल तुमची कोणतीही तक्रार असणार नाही. पण मी महाराष्ट्रातील टोलबद्दल बोलत नाही, तर NHI राष्ट्रीय महामार्गांबाबत बोलत आहे,” असं यावेळी गडकरी म्हणाले. अर्थात देशातील एनएचआयच्या टोलबाबत लवकरच नवीन धोरण येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
टोलनाके बंद होणार
“येत्या काळात टोलनाकेच राहणार नाहीत. त्यासाठी सॅटेलाईट बेस फ्री टोलिंग सिस्टिम तयार करत आहे. त्यामुळे तुम्हाला कुणीही अडवणार नाही. कॅमेऱ्याद्वारे तुमच्या नंबरप्लेटवरून टोल निघेल आणि तुम्ही जिथून निघालात तिथंपासून तुम्ही बाहेर पडाल तिथपर्यंतचाच टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाणार आहे,” असेही गडकरी यांनी सांगितले. तसेच पुढच्या 2 वर्षांत भारतातील रस्ते हे अमेरिकेपेक्षा चांगले होतील, अशा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.
advertisement
दरम्यान, वसंत व्याख्यानमालेत ‘महमार्ग विकासाचा’ या विषयावर बोलताना गडकरी यांनी देशातील रस्ते, पूल, टोलनाके आणि भावी प्रकल्पांबाबत माहिती दिली. मुंबई ते बंगळुरु थेट महामार्ग बनवण्याचं नियोजन असून मुंबई – गोवा महामार्ग जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याचं सांगितलं. तसेच देशातील लॉजिस्टिक कॉस्ट 16 टक्क्यांवरून 9 टक्क्यांपर्यंत खाली आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Toll Policy: टोलची कटकट कायमची मिटणार, गडकरी मोठ्या निर्णयाच्य तयारीत, थेट प्लॅनच सांगितला..
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement