अमरावतीकरांना मुंबई-पनवेल गाठणे होणार सोपे; रेल्वेकडून विशेष गाडीची भेट; वेळ अन् तारीख पाहा
Last Updated:
Amravati Panvel Train : मध्य रेल्वेने अमरावती ते पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 जानेवारीला अमरावतीहून गाडी सुटणार असून 26 जानेवारीला पनवेलहून परतीचा प्रवास होणार आहे.
नवी मुंबई : प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अमरावती ते पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीमुळे विदर्भ आणि कोकण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सण, सुट्ट्या तसेच खासगी कामांसाठी मुंबई तसेच पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.
पनवेलसाठी मध्य रेल्वेची विशेष गाडी
अमरावती येथून अनारक्षित विशेष गाडी क्रमांक 01416 बुधवार 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता सुटणार आहे. ही गाडी विविध महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे. रात्रीच्या प्रवासामुळे वेळेची बचत होणार असून प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा लाभ मिळेल.
पनवेलहून विशेष गाडी कधी सुटणार?
परतीच्या प्रवासासाठी हीच विशेष गाडी रविवार, 26 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी पनवेल येथून रवाना होणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता अमरावती येथे पोहोचेल. त्यामुळे अमरावती, अकोला आणि आसपासच्या जिल्ह्यांतील प्रवाशांना ये-जा करणे अधिक सोयीचे होणार आहे.
advertisement
कामगार आणि विद्यार्थ्यांना मोठा फायदा
ही गाडी अनारक्षित असल्याने सामान्य प्रवासी, कामगार, विद्यार्थी तसेच कमी खर्चात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही फायदेशीर ठरेल. प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून वेळापत्रक, थांबे आणि इतर आवश्यक माहितीची खात्री करून घ्यावी असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 12:06 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
अमरावतीकरांना मुंबई-पनवेल गाठणे होणार सोपे; रेल्वेकडून विशेष गाडीची भेट; वेळ अन् तारीख पाहा








