Central Railway: फुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वे मालामाल; 8 महिन्यांत तब्बल 'इतक्या' कोटींचा दंड वसूल

Last Updated:

फुकट्या प्रवाशांकडून मध्य रेल्वे दंड वसूल करत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्याच्या काळामध्ये मध्य रेल्वेने लाखो फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.

Central Railway: फुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वे मालामाल; 8 महिन्यांत तब्बल 'इतक्या' कोटींचा दंड वसूल
Central Railway: फुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वे मालामाल; 8 महिन्यांत तब्बल 'इतक्या' कोटींचा दंड वसूल
पुन्हा एकदा मध्य रेल्वे ॲक्टिव्ह मोडवर आलेली पाहायला मिळत आहे. फुकट्या प्रवाशांकडून मध्य रेल्वे दंड वसूल करताना दिसत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्याच्या काळामध्ये मध्य रेल्वेने लाखो फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. रेल्वे प्रवास अधिकच सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी मध्य रेल्वेने चांगलीच कंबर कसली आहे. मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षामध्ये, गेल्या आठ महिन्यांमध्ये किती फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे? आता पर्यंत किती कोटींचा दंड वसूल केला आहे? जाणून घेऊया...
2025-26 या आर्थिक वर्षामध्ये, मध्य रेल्वेने 27.51 लाख प्रवाशांवर कारवाई करत, त्यांच्याकडून 164.91 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. महसूल आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाश करणाऱ्या संख्येमध्ये गेल्या वर्षीच्या (2024- 25) तुलनेत चालू आर्थिक वर्षामध्ये वाढ झाली आहे. विनातिकीट प्रवाशांच्या संख्येत 10 % तर दंडाच्या रकमेत 19 % वाढ झाली आहे. एकट्या नोव्हेंबर 2025 मध्ये 3.74 लाख केसेस नोंदवल्या गेल्या असून 23.63 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. जो मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 68% जास्त आहे.
advertisement
मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर या पाचही विभागांमध्ये, सर्वाधिक फुकटे प्रवासी हे मुंबई विभागातच आहेत. मुंबईमध्ये फुकट्या प्रवाशांमध्ये
त्यांच्याकडून 48 कोटी 79 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वेवर दिवसेंदिवस फुकट तसेच अनधिकृत प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी फुकट्या प्रवाशांमध्ये 10 टक्के वाढ झाली. त्यांच्याकडून दंड वसुलीमध्ये सुमारे 20 टक्के वाढ नोंदवली. अशा प्रवाशांमुळे रेल्वेचे आर्थिक नुकसान तर होतेच, परंतु तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर ते अन्यायकारक ठरते. याला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे विशेष मोहीम राबवत असते. मध्य रेल्वेने अनधिकृत प्रवासी शोधण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करत आहेत. त्यामध्ये स्टेशन तपासणी, अचानक तपासणी, फोर्ट्रेस तपासणी मेगा तिकीट तपासणी मोहिमांचा समावेश असून मेल/ एक्सप्रेस गाड्या, प्रवासी गाड्या, विशेष गाड्या गाड्यांमध्ये कारवाई केली जाते.
advertisement
मुंबई विभागामध्ये, 11.34 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या फुकट्या प्रवाशांकडून 48 कोटी 79 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. पुणे विभागामध्ये, 3.5 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या फुकट्या प्रवाशांकडून 18 कोटी 40 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. भुसावळ विभागामध्ये, 6.24 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या फुकट्या प्रवाशांकडून 59 कोटी 25 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. नागपूर विभागामध्ये, 2.92 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या फुकट्या प्रवाशांकडून 18 कोटी 13 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. सोलापूर विभागामध्ये, 1.60 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या फुकट्या प्रवाशांकडून 7 कोटी 50 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, मुख्यालयामध्ये, 1.66 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या फुकट्या प्रवाशांकडून 12 कोटी 82 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
advertisement
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाकडून सर्वच प्रवाशांचे तिकिटे अथवा पासेसची तपासणी केली जात आहे. अलीकडेच एका प्रवाशाने AI च्या माध्यमातून बनवलेलं बनावट तिकिटचा प्रकार उघडकीस आला होता. तेव्हापासून टीसी प्रत्येक प्रवासाच्या मासिक पासचे किंवा तिकिटाची तपासणी करीत आहे. त्यामुळे बनावट पास काढण्यापेक्षा रेल्वेचे अधिकृत तिकिट काढून सन्मानाने प्रवास करा. रेल्वेने प्रवाशांना बनावट तिकिटांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. बनावट तिकीट बाळगणे हा भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गंभीर गुन्हा असून, यासाठी दंड आणि 7 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Central Railway: फुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वे मालामाल; 8 महिन्यांत तब्बल 'इतक्या' कोटींचा दंड वसूल
Next Article
advertisement
Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement