माजी पोलीस महानिरिक्षकाने स्वत:वरच झाडल्या गोळ्या, 12 पानी सुसाईट नोट; 'त्या' एका उल्लेखाने खळबळ
- Published by:Prachi Amale
Last Updated:
चहल हे 2015 च्या बेहबल कलान आणि कोटकपुरा गोळीबार प्रकरणातील आरोपी आहेत.
नवी दिल्ली : पंजाबचे माजी पोलिस महानिरीक्षक अमर सिंग चहल यांनी पटियाला येथे स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची भयंकर घटना घडली आहे. त्यांना तात्काळ पटियाला येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. चहल हे 2015 च्या बेहबल कलान आणि कोटकपुरा गोळीबार प्रकरणातील आरोपी आहेत. पोलिसांच्या मते, त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.अद्याप गोळी झाडल्याचे कोणतेही कारण समोर आलेले नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून पोलिसांना एक नोट मिळाली आहे. 12 पानी सुसाईड नोट असून 8 कोटीच्या फ्रॉडचा उल्लेख केला आहे. या सुसाईट नोटवरुन आर्थिक फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलिस अधीक्षक वरुण शर्मा यांनी सांगितले की, गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांचे पथक त्यांच्या घरी पोहोचले. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
advertisement
पोलीस नेमकं काय म्हणाले?
पटियालाचे एसपी पलविंदर सिंग चीमा म्हणाले, निवृत्त आयजी अमर सिंग चहल यांच्या मित्रांकडून आम्हाला माहिती मिळाली की त्यांनी एक नोट शेअर केली होती त्यामध्ये त्यांनी आत्महत्येचा उल्लेख केला होता. घटनेची माहिती मिळताच, एसएचओ, डीएसपी त्यांच्या घरी पोहोचलो त्यावेळी ते जखमी अवस्थेत आढळून आले. आम्ही त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेले. घटनास्थळी आम्हाला सुसाईड नोट मिळाली आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे आणि त्याच्यावर उपचार आणि चाचण्या सुरू आहेत. आम्ही या प्रकरणातील सर्व बाजूंनी घटनेचा तपास करत आहे. सुसाईड नोटनुसा, योग्य एफआयआर दाखल केला जाईल आणि तपास केला जाईल. ज्यामुळे पुढील कारवाई करण्यात मदत होईल.
advertisement
#WATCH | Patiala, Punjab: SP City Patiala, Palwinder Singh Cheema, says, "We received information from the friends of Retd. IG Amar Singh Chahal, stating that he shared a note saying that he could commit suicide. On receiving the information, SHO, DSP, and I reached his residence… pic.twitter.com/tqM79HTWwW
— ANI (@ANI) December 22, 2025
advertisement
चहल कोणत्या प्रकरणात आरोपी होते?
पोलिस महानिरीक्षक (आयजी) म्हणून निवृत्त झालेले चहल हे 2015 मध्ये फरीदकोटमधील बेहबल कलान आणि कोटकपुरा गोळीबार प्रकरणातील आरोपींपैकी एक होते. अतिरिक्त पोलिस महासंचालक एल.के. यादव यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने (एसआयटी) 24 फेब्रुवारी 2023 रोजी फरीदकोट न्यायालयात चहल आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.
view commentsLocation :
Delhi
First Published :
Dec 22, 2025 7:35 PM IST
मराठी बातम्या/देश/
माजी पोलीस महानिरिक्षकाने स्वत:वरच झाडल्या गोळ्या, 12 पानी सुसाईट नोट; 'त्या' एका उल्लेखाने खळबळ











