हृदयद्रावक! दिवाळीत पाहुण्यांकडे गेलेल्या चिमुकलीचा अंत,आईचा काळीज चिरणारा आक्रोश

Last Updated:

दहा वर्षांची अलका भावर या चिमुकलीचा नदीत बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

News18
News18
राहुल पाटील, प्रतिनिधी
पालघर : पालघर तालुक्यातील चळणी गावात दिवाळीच्या सुट्टीत आनंदाऐवजी शोककळा पसरवणारी एक हृदयद्रावक घटना समोर आला आहे. दहा वर्षांची अलका भावर या चिमुकलीचा नदीत बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलका भावर ही पालघरच्या दादडे येथील आश्रम शाळेत चौथी इयत्तेत शिक्षण घेत होती. दिवाळीच्या निमित्ताने ती आईसोबत नातेवाईकांकडे चळणी गावात आली होती. सोमवारी दुपारच्या सुमारास आईसोबत ती गावातील नदीत अंघोळीसाठी गेली होती. अंघोळ करताना अलकाचा पाय घसरून ती नदीच्या पाण्याच्या प्रवाहात पडली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आई आणि परिसरातील लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
advertisement

दिवाळीच्या आनंदावर विरजण

स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अलकाला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत तिचा दुर्दैवी अंत झाला होता. अलकाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे.

कुटुंबाला आवश्यक मदत मिळण्याची मागणी

घटनेची माहिती मिळताच डहाणूचे आमदार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते विनोद निकोले यांनी रुग्णालयात भेट देत अलकाच्या आईसह कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी प्रशासनाकडे कुटुंबाला आवश्यक ती मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.
advertisement

 कुटुंबावर दु:खाचा डोंगर

या घटनेमुळे चळणी परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावातील नागरिकांनी मुलांवर लक्ष ठेवण्याचं आवाहन केलं आहे. अलका भावरच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण परिसरावर  शोककळा पसरली आहे.  कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे मुलं खेळत असताना त्यांच्याकडे लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा समोर आलं आहे
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
हृदयद्रावक! दिवाळीत पाहुण्यांकडे गेलेल्या चिमुकलीचा अंत,आईचा काळीज चिरणारा आक्रोश
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement