Thane News : ठाणेकरांनी दाखवली माणुसकीची खरी ओळख,अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Diwali 2025 : ठाणे वृंदावन सोसायटीत दिवाळी संध्या 2025 अनाथ मुलांसोबत साजरी करण्यात आली. मुलांमध्ये आनंद, हास्य, प्रकाश आणि भेटवस्तूंचा उत्साह पाहायला मिळाला. समाजकार्याच्या माध्यमातून सणासुदीचा अनुभव सर्वांसाठी खास ठरला.
ठाणे : ठाण्यातील वृंदावन सोसायटी येथे ‘वृंदावन’ आणि ‘We Change’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिवाळी संध्या 2025’ या विशेष उपक्रमाचे आयोजन 19 ऑक्टोबर रोजी करण्यात आले. गेली 5 ते 7 वर्षे हा उपक्रम सातत्याने साजरा होत असून यावर्षीदेखील अनाथ आणि बेघर मुलांसोबत दिवाळीचा उत्सव मोठ्या आनंदात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक होते अमितजी जयस्वाल.
या उपक्रमामागील प्रमुख हेतू म्हणजे दिवाळीचा सण त्या मुलांसाठी खास बनवणे ज्यांना कुटुंबाची उब लाभलेली नाही. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करताना समाजातील इतर नागरिक त्यांच्यासाठी एक कुटुंब बनतात आणि त्यांना प्रेम, जिव्हाळा आणि स्नेह देतात.
advertisement
यावर्षी 'We Change' या संस्थेसोबत 'जीवन संवर्धन फाउंडेशन' आणि इतर काही स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या. 'जीवन संवर्धन फाउंडेशन' गेली 15 वर्षे अनाथ आणि बेघर मुलांसाठी शिक्षण, निवारा आणि इतर मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचे काम करत आहे. संस्थेच्या एका प्रतिनिधीने सांगितले की, “वृंदावन आणि We Change यांच्यासोबत सहभागी होऊन आमच्या मुलांना डान्ससारख्या सादरीकरणाचे व्यासपीठ मिळाले आणि आमची दिवाळी अविस्मरणीय झाली. आम्ही आयोजकांचे मनापासून आभार मानतो.”
advertisement
या कार्यक्रमात खाद्यपदार्थांपासून ते विविध हस्तनिर्मित वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले होते. विशेष म्हणजे या वस्तू अनाथ मुलांनी स्वतः तयार केलेल्या होत्या ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि कौशल्य दोन्ही वाढीस लागले.
advertisement
अमित जयस्वाल म्हणाले, “अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यामागे एकच भावना असते त्यांच्यासाठी आपणच कुटुंब आहोत हे त्यांना जाणवावे. ही अनुभूती खूप खास असते.” 'We Change' संस्थेनेही आयोजकांचे आभार मानले आणि या कार्यक्रमात सहभागी होण्याला “एक अनमोल संधी” असे म्हटले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी पुढील वर्षी नवीन संस्था सहभागी व्हाव्यात असे आवाहन केले आणि सर्वांनी पुढे येऊन समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 12:08 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Thane News : ठाणेकरांनी दाखवली माणुसकीची खरी ओळख,अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी