advertisement

मोठी बातमी! राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

Last Updated:

मोठी बातमी समोर येत आहे, राज्यसभेच्या बारा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, यामध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे.

News18
News18
मुंबई प्रतिनिधी : मोठी बातमी समोर येत आहे, राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन रिक्त जागांचा देखील समावेश आहे. छत्रपती उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे दोघंही लोकसभेवर निवडून गेल्यानं  राज्यात राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत या जागांवर देखील निवडणूक घेतली जाणार आहे.
निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यसभेच्या एकूण बारा जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे. 14 ते 21 |ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 26 ॲागस्टला अर्ज माघारी घेण्याची अंतीम मुदत आहे. तर 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी केली जाणार आहे.
महाराष्ट्राच्या दोन जागा रिक्त 
दरम्यान महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोन जागा रिक्त आहेत. ज्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे दोघंही लोकसभेवर निवडून गेल्यानं दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांसाठी देखील निवडणूक होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मोठी बातमी! राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement