Mumbai Traffic : एल्फिन्स्टन पुल वाहतुकीसाठी बंद, वाहतूक कोंडीचे नियोजन फसले; मुंबईकरांना रस्त्यावर वाहने उतरवणे झालं कठीण
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
प्रभादेवी एल्फिन्स्टन पूल बंद झाल्याने मुंबईकरांना नव्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे पूल बंद झाल्याने प्रवासी आणि वाहने इतर मार्गांनी वळविली जात आहेत.
प्रभादेवी एल्फिन्स्टन पूल बंद झाल्याने मुंबईकरांना नव्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे पूल बंद झाल्याने प्रवासी आणि वाहने इतर मार्गांनी वळविली जात आहेत.
त्यामुळे दादर‑प्रभादेवी, करी रोड, लोअर परेल, वरळी‑शिवडी मार्गयांचा वापर करणाऱ्या वाहनांमध्ये मुंबईकरांचा सर्वाधिक वेळ जात आहे १०-१५ मिनिटांच्या अंतरावर किमान ३५-४० मिनिटे वाहतूक कोंडी होते.
वाहतूक बदल आणि पर्यायी मार्ग
करी रोड ब्रिज - परेल पूर्वेकडून प्रभादेवी आणि लोअर परेलकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा ब्रिज वापरला जात आहे. सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत आणि दुपारी ३ ते रात्री ११ पर्यंत तो 'वन वे' (एक दिशा) केला आहे. रात्री ११ नंतर सकाळी ७ वाजेपर्यंत दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असते.
advertisement
टिळक ब्रीज दादर पूर्वेकडून दादर पश्चिमेकडे आणि दादर मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा ब्रिज वापरला जात आहे. चिंचपोकळी ब्रीज - परेल-भायखळा पूर्व, प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड आणि सी लिंकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी हा पूल वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 9:32 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Traffic : एल्फिन्स्टन पुल वाहतुकीसाठी बंद, वाहतूक कोंडीचे नियोजन फसले; मुंबईकरांना रस्त्यावर वाहने उतरवणे झालं कठीण