65 वर्षीय सुपरस्टारचा जलवा अजूनही कायम! बॉक्स ऑफिस हादरवून टाकणारी सुपरहिट फिल्म लवकरच OTT वर

Last Updated:
फक्त ३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ८० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटीवर येत आहे, ज्यामुळे चाहते खूप उत्सुक आहेत.
1/6
मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणेच आता साऊथ इंडस्ट्रीतील चित्रपटही जगभरात आपली जादू दाखवत आहेत. विशेषतः मल्याळम चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. नुकताच मोहनलाल यांचा एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला.

advertisement
2/6
फक्त ३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ८० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटीवर येत आहे, ज्यामुळे त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

3/6
अभिनेता मोहनलाल हे मल्याळम इंडस्ट्रीचे सुपरस्टार आहेत. त्यांच्या चित्रपटाची घोषणा होताच चाहत्यांमध्ये उत्साह संचारतो. ऑगस्टमध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा चित्रपट ‘हृदयपूर्वम’ सध्या खूप चर्चेत आहे. २८ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

4/6
‘जियो हॉटस्टार’ने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘हृदयपूर्वम’ २६ सप्टेंबरला रिलीज होणार असल्याचं जाहीर केलं आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं, “इतक्या लवकर? आता मजा येणार आहे!”

5/6
‘विकिपीडिया’वर दिलेल्या माहितीनुसार, ‘हृदयपूर्वम’चा एकूण खर्च फक्त ३० कोटी होता, पण या चित्रपटाने जगभरात ८० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने भारतात ३२ कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केलं आहे.

6/6
हा एक फॅमिली ड्रामा असून यात एक गोड प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात मोहनलाल यांच्यासोबत सिद्दीकी, लालू ॲलेक्स आणि जनार्दन यांच्यासारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सत्यन अंतिकादने केलं आहे.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement