महिलांशी शारीरिक संबंध ते गाढ झोप; अस्वलांसंबंधीत काही धक्कादायक फॅक्ट समोर

Last Updated:

अस्वलांविषयी जगभरात अनेक अफवा प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे “महिलांशी शारीरिक संबंध” या नावाखाली पसरलेल्या कहाण्या.

AI generated Photo
AI generated Photo
मुंबई : जगातल्या अनेक प्राण्यांबद्दल लोकांच्या मनात वेगवेगळ्या गोष्टी आणि समजुती असतात. कुणी सिंहाच्या ताकदीचं वर्णन करतो, तर कुणी वाघाच्या क्रौर्याचं. त्याचप्रमाणे अस्वलांविषयीही अनेक कहाण्या, अफवा आणि लोककथा प्रचलित आहेत. काही वेळा या गोष्टींना लोक सहजच खरं मानतात. आपण अस्वलांबद्दल बोलल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी काय खरं आहे काय खोटं आहे चला फॅक्ट्स जाणून घेऊ.
अस्वलांविषयी जगभरात अनेक अफवा प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे “महिलांशी शारीरिक संबंध” या नावाखाली पसरलेल्या कहाण्या. मात्र, वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे पूर्णपणे चुकीचं आहे. अस्वल हे वन्य प्राणी असून त्यांचं प्रजनन फक्त त्यांच्या जातीतील साथीदारासोबतच होतं. त्यामुळे अशा अफवांना कोणताही पुरावा नाही, त्या केवळ मिथक आहेत.
अल्पविश्रामचं रहस्य
हिवाळ्याच्या काळात अस्वल शीतनिद्रा किंवा अल्पविश्राम (Hibernation) घेतात. असं म्हटलं जातं आणि हे खरं आहे. या अवस्थेत त्यांच्या शरीरातील मेटाबॉलिक गती खूपच मंदावते. अमेरिकन ब्लॅक बिअरचं उदाहरण घ्यायचं झालं तर हृदयाचे ठोके 55 वरून फक्त 8–12 प्रति मिनिट इतके कमी होतात. या काळात अस्वल काही खात नाहीत, पित नाहीत, अगदी शौचसुद्धा करत नाहीत. शरीरात साठवलेल्या चरबीवर ते जगतात.
advertisement
गंध आणि श्रवणशक्ती
अस्वलांना गंध ओळखण्याची क्षमता मानवापेक्षा 7 पट जास्त असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात. त्याचबरोबर त्यांची ऐकण्याची शक्तीही अत्यंत तीव्र आहे. जंगलातील अगदी सूक्ष्म आवाजसुद्धा ते दूरवरून ऐकू शकतात. त्यामुळे अन्न शोधणे, संकट ओळखणे आणि शिकार करणे हे त्यांच्यासाठी सोपं होतं.
मातृत्वाचं अनोखं नातं
मातृत्व हे अस्वलांच्या जीवनातील सर्वात महत्वाचं अंग आहे. आई अस्वल पिल्लांना जन्मानंतर दूध पाजते, त्यांचं रक्षण करते आणि त्यांना जिवनकौशल्य शिकवते. पिल्लांच्या सुरक्षेसाठी ती कोणत्याही टोकाला जाऊ शकते.
advertisement
ध्रुवीय अस्वलाचं वैभव
ध्रुवीय अस्वल (Polar Bear) हा सर्वात मोठा स्थलीय मांसाहारी प्राणी आहे. त्यांचं वजन तब्बल 700 किलो किंवा 1500 पाउंडपर्यंत जाऊ शकतं. त्यांचा आकार आणि ताकद हे निसर्गाच्या अद्भुत देणग्यांपैकी एक मानलं जातं.
अस्वलांविषयीच्या “महिलांशी शारीरिक संबंध” अशा अफवा म्हणजे केवळ गैरसमज. खरी गोष्ट म्हणजे अस्वल हे निसर्गातील अत्यंत रोचक आणि महत्वाचे प्राणी आहेत. त्यांची शीतनिद्रा, गंधशक्ती, श्रवणशक्ती, मातृत्व आणि ताकद यामुळे ते विशेष ठरतात. म्हणूनच अस्वलांविषयी खोटी माहिती न पसरवता, त्यांच्या खऱ्या वैशिष्ट्यांकडे लक्ष दिलं पाहिजे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
महिलांशी शारीरिक संबंध ते गाढ झोप; अस्वलांसंबंधीत काही धक्कादायक फॅक्ट समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement