इस्थर अनुह्यासोबत 'त्या' दिवशी काय घडले? फाशीची शिक्षा सुनावलेला सानप निर्दोष कसा काय ठरला?

Last Updated:

Esther Anuhya rape and murder Case: सॉफ्टवेअर इंजिनिअर इस्थर अनुह्या बलात्कार व हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेला दोषी चंद्रभान सानप याची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

Esther Anuhya rape and murder Case
Esther Anuhya rape and murder Case
मुंबई: मुंबईतील २३ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर इस्थर अनुह्या बलात्कार व हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेला दोषी चंद्रभान सानप याची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. सानपला २०१५ मध्ये विशेष महिला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला त्याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली होती. यावर सानपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज सरकारी वकिलांच्या युक्तीवादात त्रुटी आढल्याचे सांगत आज सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
इस्थर अनुह्या बलात्कार व हत्या प्रकरणातील घटनाक्रम:
कधी?  
प्रकरण कधी घडले: 5 जानेवारी 2014
मृतदेह कधी सापडला: 16 जानेवारी 2014
सत्र न्यायालयाने कधी फाशीची शिक्षा सुनावली: 2014
उच्च न्यायालयाचा निर्णय: 2025
कोण?  
पीडित: इस्थर अनुह्या- आंध्रप्रदेशातील मच्छलीपट्टणम येथील रहिवासी व मुंबईतील टीसीएस ऑफिसमध्ये कर्मचारी.
आरोपी: चंद्रभान सानप, मुंबई सेशन्स कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलेला गुन्हेगार.
advertisement
कुठे?  
घटना कुठे घडली: लोकमान्य टिळक टर्मिनस ते कांजुरमार्ग परिसर.
मृतदेह कुठे सापडला: कांजुरमार्ग येथील निर्जन परिसर.
काय?  
हे प्रकरण 'रेअरेस्ट ऑफ रेअर' असल्याचे मत व्यक्त करत. उच्च न्यायालयाने चंद्रभान सानपच्या फाशीच्या शिक्षेला दिली मान्यता.आरोपीवर हत्या (कलम 302), बलात्कार (कलम 376A), आणि इतर कलमांखाली शिक्षा ठोठावली.
का? 
आरोपीने इस्थरला घर सोडण्याच्या बहाण्याने फसवले.
advertisement
निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या करून सामान लुटले.
डीएनए पुरावे आणि सात साक्षीदारांनी दिलेली ओळख महत्त्वाची ठरली.
कसे?
542 पानांचे आरोपपत्र दाखल, 42 साक्षीदारांची चौकशी.
स्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीची ओळख पटली.
2 फेब्रुवारी 2014 रोजी सानपला अटक; चौकशीत गुन्ह्याची कबुली.
उच्च न्यायालयाचा निर्णय
न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने सानपला या घटनेचा कोणताही पश्चात्ताप नसल्याचे सांगितले.समाजासाठी धोका ठरणाऱ्या आरोपीसाठी सुधारण्याची शक्यता नाही, म्हणून फाशीची शिक्षा योग्य ठरवली.
advertisement
सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
28 जानेवारी 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून सानपची निर्दोष मुक्तता
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
इस्थर अनुह्यासोबत 'त्या' दिवशी काय घडले? फाशीची शिक्षा सुनावलेला सानप निर्दोष कसा काय ठरला?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement