Mumbai : एक्स-बॉयफ्रेंड बनला हैवान, मित्रांना बोलवून तरुणीवर मुंबईत दोन ठिकाणी गँगरेप
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ज्याच्यावर कधीकाळी जीवापाड प्रेम केलं त्यानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक्स-बॉयफ्रेंडने त्याच्या मित्रांना बोलवून तरुणीवर गँगरेप केला आहे.
मुंबई : ज्याच्यावर कधीकाळी जीवापाड प्रेम केलं त्यानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भिवंडीमध्ये 22 वर्षांच्या मुलीवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी गँगरेप करण्यात आला आहे. मुलीच्या एक्स-बॉयफ्रेंडने त्याच्या मित्रांना बोलावून मुलीवर अत्याचार केले आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मुलीच्या गँगरेप प्रकरमात सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीसोबत 20 फेब्रुवारीला सकाळी एका शाळेजवळ गँगरेप केला गेला. मुलीचं तिच्याच एक्स-बॉयफ्रेंडने अपहरण केलं आणि त्याच्या चार मित्रांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले.
याप्रकरणातल्या मुख्य आरोपीचं (मुलीचा प्रियकर) मागच्या काही वर्षांपासून मुलीसोबत अफेयर होतं, पण या दोघांचं ब्रेक अप झाल्यानंतर मुलगी दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली. ती दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याचं आरोपीला सहन झालं नाही, त्यामुळे त्याने 19 फेब्रुवारीला रात्री मुलीच्या भावाचं अपहरण केलं, यानंतर त्याने मुलीच्या भावाला तिला त्याठिकाणी बोलावण्यासाठी मजबूर केलं.
advertisement
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार मुलीला तिच्या भावाचा फोन आला, ज्यात त्याने संकटात असल्याचं बहिणीला सांगितलं. तरुणी जेव्हा भावाला सोडवायला त्या ठिकाणी गेली तेव्हा आरोपींनी पीडित तरुणी, तिचा भाऊ आणि ऑटोरिक्षा ड्रायव्हरला मारहाण केली. यानंतर आरोपींनी नागावमध्ये एका शाळेजवळ आणि फातिमानगरमध्ये एका पिकअप व्हॅनमध्ये तरुणीवर अत्याचार केले, म्हणजेच या मुलीसोबत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गँगरेप केला गेला.
advertisement
पीडित तरुणी कशीबशी नराधमांच्या तावडीतून सुटली आणि तिने थेट भिंवडी पोलिसांना संपर्क केला. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सर्व 6 आरोपींवर बलात्कार, गँगरेप, भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
Location :
Bhiwandi Nizampur,Thane,Maharashtra
First Published :
February 23, 2025 7:07 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : एक्स-बॉयफ्रेंड बनला हैवान, मित्रांना बोलवून तरुणीवर मुंबईत दोन ठिकाणी गँगरेप