Mumbai News: बाप्पाच्या आगमनासाठी बदलली राणीच्या बागेची वेळ, कसे असतील बदल?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai News: गणपती बाप्पांच्या आगमनासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. अशातच राणीच्या बागेबाबत महत्त्वाचं अपडेट आलं आहे. ही बाग गुरुवारी बंद राहणार आहे.
मुंबई: गणरायाच्या आगमनाच्या दिवशी मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. परंतु, येत्या बुधवारी, म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे या दिवशी राणीची बाग खुली राहणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी, 28 ऑगस्ट रोजी उद्यान बंद ठेवण्यात येणार आहे.
भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय असून राणीची बाग म्हणून ते प्रसिद्ध आहे. सुट्टीच्या काळात या ठिकाणी मुंबईकरांची गर्दी असते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी ही बाग खुली असते. तर साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, आता गणपती आगमनाची सुट्टी असल्याने बुधावारी राणीची बाग सुरू राहणार आहे.
advertisement
दरम्यान, महानगरपालिकेने यापूर्वी एक ठारव मंजूर केला आहे. त्यानुसार, बुधवारी सार्वजनिक सुटी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहील, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी ते बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे बुधवारी, 27 ऑगस्ट रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलीये.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2025 12:02 PM IST


