advertisement

Mumbai : गॅस पाईपलाईन हवी का? मुंबईत सुरू आहे मोठा स्कॅम, सापळा पाहून पोलीसही चक्रावले!

Last Updated:

इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतामध्ये एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. सिलेंडरवरून नागरिकांमध्ये गोंधळ असतानाच मुंबईमध्ये गॅस पाईपलाईनचा मोठा स्कॅम सुरू झाला आहे.

गॅस पाईपलाईन हवी का? मुंबईत सुरू आहे मोठा स्कॅम, सापळा पाहून पोलीसही चक्रावले! (AI Generated Image)
गॅस पाईपलाईन हवी का? मुंबईत सुरू आहे मोठा स्कॅम, सापळा पाहून पोलीसही चक्रावले! (AI Generated Image)
मुंबई : इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतामध्ये एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेडरवर निर्बंध आल्यामुळे काही ठिकाणी हॉटेल आणि उपहारगृहांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी लोक लांबच लांब रांगा लावतानाही दिसत आहेत. एलपीजी सिलेंडरच्या मुद्द्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे, तर दुसरीकडे पाईपलाईनच्या माध्यमातून येणाऱ्या गॅसच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही.

मुंबईमध्ये सुरू आहे स्कॅम

एलपीजी सिलेंडरवरून गोंधळ सुरू असतानाच सायबर गुन्हेगारांनी 24 तासांमध्येच मुंबईत 7 वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांची फसवणूक केली आहे. सायबर गुन्हेगारांनी 8 लाख 40 हजार रुपये नागरिकांकडून लुटले आहेत. सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना शिकार बनवण्यासाठी APK फाईल पाठवली आणि त्यांना लिंकवर क्लिक करायला लावलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
advertisement
सायबर गुन्हेगारांनी महानगर गॅस लिमिटेट म्हणजेच MGL च्या नावाने APK फाईल पाठवली. मुंबईमधील बोरिवली आणि खार भागामध्ये 3-3 आणि पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये 1 प्रकरण समोर आलं आहे. सायबर गुन्हेगारांनी APK फाईल पाठवून नागरिकांची बँक खाती खाली केली.

पोलीस तपास सुरू

मुंबईमध्ये मागच्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे पोलीस प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. पीडित नागरिकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच अनोळखी नंबर, लिंक आणि APK फाईलवर क्लिक करू नका, सावध राहा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : गॅस पाईपलाईन हवी का? मुंबईत सुरू आहे मोठा स्कॅम, सापळा पाहून पोलीसही चक्रावले!
Next Article
Maharashtra Kesari : 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यावर बक्षिसांचा पाऊस, रोख रक्कम अन् फॉर्च्युनर गाडी, कोण बाजी मारणार?
'महाराष्ट्र केसरी' विजेत्यावर बक्षिसांचा पाऊस, रोख रक्कम अन् फॉर्च्युनर गाडी, कोण बाजी मारणार?
  • महाराष्ट्र केसरीचा विजेता मालामाल होणार

  • फॉर्च्युनर गाडीसह रोख बक्षीस मिळणार

  • मानाची गदा कोण पटकावणार?

View All
advertisement