RBI Jobs : दहावी उत्तीर्ण आहात? मग रिझर्व्ह बँकेत व्हा सरकारी अधिकारी; 572 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू
Last Updated:
RBI Office Attendant Recruitment 2026: RBI मध्ये ऑफिस अटेंडंट पदासाठी भरती जाहीर झाली आहे. दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आता तुमच्या हातात आहे. RBI मध्ये ऑफिस अटेंडंट पदासाठी भरती जाहीर झाली आहे. मात्र या सुरु झालेल्या भरतीसाठी कोण अर्ज करु शकतात तसेच अर्ज करण्याची अंतिम मुदत काय असेल या सर्वांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
'या' शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनाच करता येणार अर्ज
या भरतीसाठी दहावी पास किंवा अंडरग्रॅज्युएट उमेदवारही अर्ज करू शकतात. ही नोकरी तुम्हाला देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत काम करण्याची संधी देते आणि काम करताना खूप काही शिकायला मिळते.
अर्ज प्रक्रिया 15 जानेवारीपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 फेब्रुवारी 2026 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसाठी जवळपास 20 दिवसांचा कालावधी उपलब्ध आहे. या भरतीसाठी एकूण 291 अनारक्षित पदे आहेत तर त्याचबरोबर 86 OBC, 51 EWS, 58 ST आणि 89 SC जागा राखीव आहेत.
advertisement
'या' पदासाठी पात्र होण्यासाठी वयाची अट काय आहे?
नोकरीसाठी उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे असावे तर राखीव वर्गासाठी वयोमर्यादेत सवलत आहे. ही भरती देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये केली जाणार आहे जसे की मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरु, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, आणि पाटना.
निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षेद्वारे होईल, जिथे रीझनिंग, इंग्रजी आणि जनरल अवेअरनेस या विषयांची टेस्ट घेतली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना पगार रुपये 24,250 मिळेल तसेच महागाई भत्ता आणि HRA देखील दिला जाईल. इच्छुकांनी लवकर अर्ज करणे आवश्यक आहे कारण ही सुवर्णसंधी फक्त मर्यादित वेळासाठी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 2:32 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
RBI Jobs : दहावी उत्तीर्ण आहात? मग रिझर्व्ह बँकेत व्हा सरकारी अधिकारी; 572 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू








