ग्रॅज्युएशननंतर सरकारी नोकरी हवी? FSSAI मध्ये सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्ज कुठे अन् कसा करावा?
Last Updated:
Government Job Recruitment : एफएसएसएआयमध्ये फूड अॅनालिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ही केंद्र सरकारची उत्तम नोकरीची संधी असून अर्ज प्रक्रिया ऑनलाइन सुरू आहे. इच्छुकांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.
जर तुम्ही सध्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजे(FSSAI) येथे नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.चला तर या विषयीची सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेऊयात.
या क्षेत्रात सरकारी नोकरीची मोठी संधी
एफएसएसएआयकडून फूड अॅनालिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली असून 11th FAE-2025 अंतर्गत ही प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जानेवारी 2026 आहे. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या कालमर्यादेत अर्ज करणे आवश्यक आहे.
'या' ठिकाणी करता येणार अर्ज?
ही नोकरी केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित संस्थेत मिळणारी असल्याने उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे. एफएसएसएआयमध्ये काम करण्याची संधी म्हणजे स्थिर करिअर, आकर्षक वेतन आणि उत्तम कामाचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांनी fssai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
advertisement
शैक्षणिक पात्रता?
फूड अॅनालिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे केमिस्ट्री, डेअरी केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, फूड सेफ्टी किंवा अॅग्रीकल्चर सायन्स या विषयांपैकी कोणत्याही विषयातील पदवी असणे अनिवार्य आहे. तसेच पदव्युत्तर शिक्षण किंवा पीएचडी पूर्ण केलेले उमेदवारदेखील अर्ज करण्यास पात्र आहेत. याशिवाय उमेदवाराने इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट्स अंतर्गत फूड अॅनालिस्ट सेक्शनची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. संबंधित क्षेत्रातील किमान तीन वर्षांचा फूड अॅनालिसिसचा अनुभव असणे आवश्यक आहे.
advertisement
अर्ज करण्याची पद्धत?
1)सर्वप्रथम उमेदवारांनी एफएसएसएआयच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी.
2)त्यानंतर होमपेजवरील भरती किंवा करिअर विभागातील संबंधित लिंकवर क्लिक करावे.
3)नवीन उमेदवारांनी आधी रजिस्ट्रेशन करावे आणि आवश्यक माहिती भरावी.
4)रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर लॉग इन करून संपूर्ण अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरावा.
5)शेवटी आवश्यक शुल्क भरून अर्ज सबमिट करावा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 12:57 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
ग्रॅज्युएशननंतर सरकारी नोकरी हवी? FSSAI मध्ये सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्ज कुठे अन् कसा करावा?











