advertisement

Mumbai: रेल्वे रुळावर जाऊन झोपला, लोक ओरडत होती, तितक्या समोरून लोकल आली, CSMT वरील घटनेचा VIDEO

Last Updated:

सोमवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर लोकलच्या प्लॅटफॉर्मवर एक धक्कादायक प्रकार समोर आला.

News18
News18
श्रीकृष्ण औटी, प्रतिनिधी
मुंबई:  मुंबईतील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकल गाड्यांच्या प्लॅटफॉर्मवर एक कचराा वेचक झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचवेळी समोरून लोकल गाडी येत असल्यानं काही क्षणांसाठी स्थानकावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. लोकांनी आरडाओरडा करून या कचरा वेचक तरुणाला हुसकावून लावलं.
मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलवर गर्दी काही केल्या कमी होत नाही. त्यात दिवसेंदिवस वाढत चाललेले अपघाताचे प्रश्न आणि चिंतेचा विषय बनला आहे. मुंबई लोकलचं मुख्य स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा ताण सर्वाधिक असतो. लोकल स्थानकामध्ये दर मिनिटाला गाडी सुटत असते, त्यामुळे इथं प्रवाशांची नेहमी वर्दळ असते.
advertisement
अशातच सोमवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर लोकलच्या प्लॅटफॉर्मवर एक धक्कादायक प्रकार समोर आला. एक कचरा वेचक तरुण हा  रुळावर जाऊन झोपलेला होता. लोकांनी आरडाओरड केला. पण तरीही हा  तरुण उठायचं काही नाव घेत नव्हता. प्रवाशांनी ही बाब तात्काळ रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. त्यामुळे संभाव्य अपघात टळला आणि मोठी दुर्घटना होण्यापासून बचाव झाला.
advertisement
घटनेनंतर काही काळ प्लॅटफॉर्मवरील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात आलं होतं. रेल्वे पोलिसांकडून संबंधित व्यक्तीची चौकशी सुरू असून तो प्लॅटफॉर्मवर कसा पोहोचला याचा तपास केला जात आहे. हा तरुण कोण होता आणि कुठून आला, याची माहिती अद्याप समोर आली नाही. पण, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: रेल्वे रुळावर जाऊन झोपला, लोक ओरडत होती, तितक्या समोरून लोकल आली, CSMT वरील घटनेचा VIDEO
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement