Mumbai Crime : बापच निघाला वैरी! अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकलीसोबत अमानुष कृत्य, ती तडफडत होती अन् तो...
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Mumbai Crime News : आपल्या तीन वर्षांच्या मुलीला मदत करण्याऐवजी गंभीर दुखापतीनंतर तिला तलावाजवळ सोडून दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल ९ महिन्यांनंतर मुलीच्या पित्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीचे नाव अमीना सुहान खान-मुल्ला (वय ३, रा. ग्रँट रोड) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमीना व तिची मोठी बहीण सध्या पित्याजवळ होत्या.
मुंबई : आपल्या तीन वर्षांच्या मुलीला मदत करण्याऐवजी गंभीर दुखापतीनंतर तिला तलावाजवळ सोडून दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल 9 महिन्यांनंतर मुलीच्या पित्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमीना आणि तिची मोठी बहीण सध्या पित्याजवळ होत्या. आई सुमय्या सुहान खान या कामानिमित्त अहमदाबादला गेल्या होत्या. 8 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता पती सुहान खान मुल्ला यांचा कॉल सुमय्या यांना आला त्यांनी अमीना जिन्यावरून पडल्याचे सांगितले.
advertisement
सुमय्या यांनी तिला त्वरित रुग्णालयात नेण्याची अनेकदा विनंती केली. मात्र सुहान खानने दोन दिवस अमीनाला रुग्णालयात नेलेच नाही. 10 जानेवारी रोजी खानने पुन्हा फोन करून सांगितले की अमीना बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत सापडली आहे. पण त्यानंतरही तिला दवाखान्यात न नेता तिच्यावर उपचार करण्याऐवजी तीला तलावाजवळ टाकून दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement
नंतर कुटुंबातील आलम नावाच्या नातेवाईकाने अमीनाला वाशीतील रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले. यानंतर तपास यंत्रणांनी या प्रकरणाची बारकाईने चौकशी केली. बालिकेच्या संशयास्पद मृत्यूबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर अखेर सुहान खान मुल्ला याच्यावर बालहत्या आणि बेपर्वाईने मृत्यूला कारणीभूत ठरणे या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
advertisement
या प्रकारामुळे पालकत्व, जबाबदारी आणि मानवी मूल्यांचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. एका निर्दयी वडिलांच्या कृत्यामुळे एका चिमुकलीचे आयुष्य घालवले गेले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 19, 2025 12:51 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : बापच निघाला वैरी! अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकलीसोबत अमानुष कृत्य, ती तडफडत होती अन् तो...








