मोठी बातमी! मुंबईत चार ठिकाणी कबुतरखाने सुरू, दाणे टाकण्याची वेळ पण ठरली; मुंबई पालिकेचा निर्णय

Last Updated:

मुंबईत चार नवीन ठिकाणी कबुतरखान्यांसाठी परवानगी देण्याचा अंतरिम निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

News18
News18
मुंबई :  मुंबईत सध्या कबुतरांमुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांवरून मोठा गदारोळ सुरु असताना मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत चार नवीन ठिकाणी वेळेतच कबुतरांना 'नियंत्रितरित्या दाणे टाकण्यास परवानगी देण्यात आली आहे. तज्ज्ञ समिती अहवाल आणि न्यायालयाचे आदेश प्राप्त होईपर्यंत अंतरिम व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र विद्यमान कबुतरखाने सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही, ते बंदच राहणार, हे पालिकेने स्पष्ट केले आहे.
मुंबईतील कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, कबुतरखान्यांबाबत नागरिकांच्या सूचना मागवून अंतरिम निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते त्यानुसार मुंबईत (१) जी दक्षिण विभागातील वरळी जलाशय (वरळी रिझर्व्हायर), (२) के पश्चिम विभागात खारफुटी परिसर, लोखंडवाला बॅक रोड, वेसावे एसटीपी प्रकल्पाजवळ, अंधेरी पश्चिम, (३) टी विभागात खाडीकडील परिसर, जुना ऐरोली - मुलुंड जकात नाका, ऐरोली - मुलुंड जोड रस्ता, मुलुंड (पूर्व), आणि (४) आर मध्य विभागात गोराई मैदान, बोरिवली (पश्चिम) या चार नवीन ठिकाणी कबुतरखान्यांसाठी परवानगी देण्याचा अंतरिम निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. मात्र आधीचे कबुतरखाने सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही. जे कबुतरखाने बंद आहेत, ते बंदच राहतील, असेही स्पष्ट करण्यात येत आहे.
advertisement

दोन तास  दाणे टाकण्यास परवानगी 

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, चारही ठिकाणी कबुतरांना 'नियंत्रितरित्या दाणे टाकण्यास परवानगी असणार आहे. फक्त सकाळी ७ ते ९ या दोन तासांच्या कालावधीतच कबुतरांना दाणे पुरवता येतील. अन्य कोणत्याही वेळेत दाणे पुरवता येणार नाहीत. महत्त्वाचे म्हणजे, या चारही जागांवर कबुतरखान्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे आली तरच ही परवानगी देण्यात येईल. कबुतरांना दाणे पुरवल्यामुळे वाहने व पादचारी यांना अडथळा होवू नये, कबुतरखान्याच्या जागी संपूर्ण स्वच्छता राखणे, नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्यांची दखल घेवून योग्य ती कार्यवाही करणे, या सर्व बाबींची दक्षता संबंधित संस्थेला घ्यावी लागेल. त्याअनुषंगाने संस्थेकडून प्रतिज्ञापत्र देखील घेतले जाणार आहे.
advertisement

आरोग्याविषयी जनजागृतीकरता फलक लावण्याचे आदेश

कबुतरखान्यांच्या या व्यवस्थापनामध्ये संबंधित प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त हे समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) असतील. या कबुतरखान्यांच्या परिसरात आरोग्याविषयी जनजागृतीकरता फलकही लावण्यात येतील. दरम्यान, कबुतरखान्यांबाबत नागरिकांकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे एकूण ९ हजार ७७९ सूचना व हरकती, तक्रारी आदी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये कबुतरखाना बंद करणे, सुरु ठेवणे, स्वच्छता राखणे, नियंत्रित पद्धतीने दाणे पुरवणे (controlled feeding) अशा सर्व पैलुंचा समावेश आहे. कबुतरखान्यांबाबत तज्ज्ञ समितीचा अहवाल आणि न्यायालयाचे आदेश येईपर्यंत, अंतरिम कार्यवाही म्हणून महानगरपालिकेने या नवीन चार जागांना परवानगी दिली आहे, असे स्पष्ट करण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मोठी बातमी! मुंबईत चार ठिकाणी कबुतरखाने सुरू, दाणे टाकण्याची वेळ पण ठरली; मुंबई पालिकेचा निर्णय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement