Konkan Railway Ro Ro service : कोकणकरांच्या फायद्याची बातमी, रो-रो सेवेबाबत कोकण रेल्वेचा मोठा निर्णय

Last Updated:

Ro-Ro Service Capacity Increase : कोकण रेल्वेने रो-रो सेवेची क्षमता वाढवली आहे. आता अधिक ट्रक एका वेळेस वाहतूक करता येतील. यामुळे मालवाहतूक जलद आणि सुरक्षित होईल.

Konkan Railway Ro-Ro service capacity increase
Konkan Railway Ro-Ro service capacity increase
मुंबई : कोकण रेल्वेमार्गावरील रो-रोही सेवा अतिशय महत्त्वाची अशी सेवा आहे. जी गेल्या साधारण 26 वर्षापासून सुरु असून मालवाहतुकीसाठी अत्यंत कामाला येते आहे. हीच रोल ऑन रोल ऑफ सेवा जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तू पटकन आणि सुरक्षितपणे पोहचवण्यासाठी वापरली जाते. मात्र, या सेवेत आता एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे ज्याचा फायदा शेतकरी आणि व्यापारांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
रो-रो सेवा का वापरली जाते?
सध्याची रो-रो सेवा ही धान्य, फळे, भाजीपाला, दैनंदिन उपयोगातील वस्तू आणि इतर अत्यावश्यक माल वाहतुकीसाठी सुरु आहे. यामुळे ट्रक रस्त्यावरून जाण्याऐवजी माल रेल्वेने वेगाने आणि सुरक्षितपणे वाहून नेला जाऊ शकतो. यासोबतच या सेवेमुळे वातावरणातील प्रदूषण कमी होते आणि त्यात इंधनाची बचत ही मोठ्या प्रमाणात कमी होते..
advertisement
'हा' केला महत्त्वपूर्ण बदल
पूर्वी रो-रो वॅगन साधारण 50 टन माल वाहून नेऊ शकत होती. पण, 50 टनपेक्षा जास्त वजन असलेले ट्रक या सेवेवर वाहतूक करू शकत नव्हते. आता कोकण रेल्वेने वॅगनची क्षमता वाढवून 57 टन केली आहे. यामुळे अवजड व्यावसायिक वाहनांची वाहतूक अधिक सोपी होणार आहे.
ही वाढलेली क्षमता मालवाहतुकीत कार्यक्षमता सुधारेल. अधिक वजनाचे ट्रक जलदपणे रेल्वे मार्गाने पाठवता येतील तसेच रस्त्यांवरील वाहतूक कमी होईल आणि मालवाहतुकीचा खर्चही कमी होईल.याचा थेट फायदा शेतकरी आणि इतर व्यवसायिकांना मिळणार आहे.
advertisement
कोकण रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय मालवाहतुकीसाठी मोठे पाऊल ठरणा आहे. इतकेच नव्हे तर आता ही सेवा अधिक ट्रक आणि जास्त माल वाहू शकेल, ज्यामुळे देशभरातील व्यापार आणि स्थानिक वस्तूंचा पुरवठा सोपा होईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Konkan Railway Ro Ro service : कोकणकरांच्या फायद्याची बातमी, रो-रो सेवेबाबत कोकण रेल्वेचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement