जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस दादरपर्यंतच धावणार, काय आहे कारण?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Sitraj Ramesh Parab
Last Updated:
Konkan Railway: कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकणातून येणाऱ्या जनशताब्दी, तेजससह 3 गाड्या दादर आणि ठाणेपर्यंतच धावणार आहेत.
मुंबई: कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वेच्या मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरु एक्स्प्रेस या 3 गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ऐवजी ठाणे आणि दादर स्थानकांपर्यंतच धावणार आहेत. सीएसएमटी मुंबई येथील फलाटाच्या विस्तारिकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे 31 जानेवारीपर्यंत या गाड्या ठाणे, दादर पर्यंत धावणार होत्या. मात्र, विस्तारीकरणाचे काम रखडल्याने ही मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
सीएसएमटी येथे पायाभूत सुविधा आणि फलाट क्रमांक 12 आणि 13 च्या विस्तारीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरु एक्स्प्रेस या गाड्यांचे वेळापत्रक देखील बदलले आहे. या गाड्या आता सीएसएमटी ऐवजी ठाणे आणि दादर स्थानकापर्यंतच धावत आहेत. आता हा कालावधी वाढवला असून 28 फेब्रुवारीपर्यंत हीच स्थिती कायम राहणार आहे.
advertisement
कोकण रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मंगळुरु ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (12134) ही गाडी ठाणे स्थानकापर्यंतच धावणार आहे. मडगाव जंक्शन ते सीएसएमटी तेजस (22120) आणि मडगाव जंक्शन ते सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस (12052) या गाड्या येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत, त्यामुळे प्रवाशांना योग्य नियोजन करूनच प्रवास करावा लागणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 05, 2025 8:14 AM IST