Mumbai Metro : डिस्चार्ज बॅटरी द्या आणि फुल्ल चार्ज बॅटरी घ्या; मेट्रो स्टेशनवर सुरू होणारी ही हायटेक सुविधा नेमकी कशी आहे?

Last Updated:

Electric Vehicle Charging At Metro Stations : मुंबई मेट्रो 3 भुयारी मार्गिकेवरील 23 स्थानकांमध्ये ईलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी स्वॅपिंग मशीन्स बसवण्यात येणार आहेत. या सुविधेमुळे ईव्ही वापर वाढण्यास मदत होणार असून प्रदूषण कमी होण्याची अपेक्षा आहे.

News18
News18
मुंबई : मुंबईत ईलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा आणि प्रदूषण कमी व्हावे यासाठी मेट्रो प्रशासनाकडून आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 मार्गिकांनंतर आता मेट्रो 3 भुयारी मार्गिकेवरील स्थानकांमध्येही ईलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी स्वॅपिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मेट्रोचा प्रवास आणि ई-वाहनांची चार्जिंग एकाच ठिकाणी
मेट्रो 3 मार्गिकेवरील एकूण 23 ठिकाणी बॅटरी स्वॅपिंग मशीन्स बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सुविधेमुळे ईलेक्ट्रिक दुचाकी, चारचाकी तसेच लहान व्यावसायिक वाहनांचे चालक काही मिनिटांत बॅटरी बदलू शकणार आहेत. त्यामुळे वाहन चार्ज करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे.
'या' ठिकाणी बसणार बॅटरी स्वॅपिंग मशीन्स
आरे जेव्हीएलआर, सिप्झ, एमआयडीसी, सांताक्रुझ मेट्रो स्थानक, वांद्रे-कुर्ला संकुल, धारावी, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या महत्त्वाच्या ठिकाणी ही बॅटरी स्वॅपिंग मशीन्स बसवण्यात येणार आहेत. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्याने ईलेक्ट्रिक वाहनचालकांना या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे.
advertisement
याआधी दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ मार्गिका आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 मार्गिकांवर अशा प्रकारची बॅटरी स्वॅपिंग केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्या ठिकाणी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ही सुविधा मेट्रो 3 मार्गिकेवरही विस्तारण्यात येत आहे.
मुंबईतील वाढते वायू प्रदूषण लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांनी ईलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी मेट्रो स्थानकांजवळच बॅटरी बदलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. यामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळणार आहे
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro : डिस्चार्ज बॅटरी द्या आणि फुल्ल चार्ज बॅटरी घ्या; मेट्रो स्टेशनवर सुरू होणारी ही हायटेक सुविधा नेमकी कशी आहे?
Next Article
advertisement
BMC Election Voting Marker : मतदानाची शाई एका मिनिटात गायब! मुंबई, कल्याण ते पुणे सगळीकडे गोंधळ, उमेदवार धास्तावले, नेमका प्रकार काय?
मतदानाची शाई एका मिनिटात गायब! मुंबई, कल्याण ते पुणे सगळीकडे गोंधळ, उमेदवार धास्
  • मतदान करणाऱ्या मतदारांच्या बोटांवर लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याचा प्रकार

  • मुंबई, ठाणे ते पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्येही मार्करच्या शाईने घोळ घातला

  • शाई पुसली जात असल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.

View All
advertisement