St Bus : एसटी महामंडाळाला बाप्पा पावला; गणेशोत्सवानिमित्ताने केली तब्बल इतक्या कोंटीची कमाई
Last Updated:
Ganeshotsav 2025 : गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांची सोयीसाठी विशेष बस सेवा सुरू केली होती. या विशेष व्यवस्थेमुळे एसटीला मोठा आर्थिक फायदा झाला आहे.
मुंबई :  गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकण प्रवासासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठ्या प्रमाणावर बस सेवा वाढवली आहे. यंदा गणेशभक्तांच्या मोठ्या संख्येच्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी एसटीने 5,200 अतिरिक्त बसेस कोकणमार्गावर चालवल्या. या अतिरिक्त बसेसमुळे 22 ऑगस्टपर्यंत मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणला जाण्यासाठी एकूण 5,103 बसेस फुल्ल झाल्या होत्या. या गर्दीमुळे एसटीला तब्बल 11 कोटी 71 लाख 54 हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे आणि रस्ते मार्गाने कोकणमध्ये प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाढते. मात्र, एसटीचे विशेष नियोजन हे प्रवाशांच्या सोयीसाठी केलेले असते. एसटी सेवा थेट गावात, वाडी-वस्तीपर्यंत पोहोचते, त्यामुळे कोकणवासीय एसटीला पसंती देतात. तसेच, वैयक्तिक तिकीट बुकिंग तसेच गट बुकिंगसाठीही एसटीची सुविधा उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांना सोयीसाठी ही सुविधा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
advertisement
यावर्षी एसटीने विशेष सवलतीही जाहीर केल्या होत्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी 100 टक्के सवलत तर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 टक्के सवलत देण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांच्या बुकिंगमध्ये मोठी वाढ दिसून आली.
ठाणे विभागातून सर्वाधिक बुकिंग झाले, जिथून एकूण 2,671 बसेस फुल्ल झाल्या. मुंबई विभागातून 1,810 बसेस बुक झाल्या, तर पालघर आणि रायगड विभागातून 622 बसेस भरल्या. उत्पन्नाच्या बाबतीतही ठाणे विभागाने अग्रणी भूमिका बजावली असून, ठाणे विभागातून एसटीला 7 कोटी 34 लाख रुपये उत्पन्न झाले. मुंबई विभागातून 4 कोटी 29 लाख रुपये तर पालघर व रायगड विभागातून 39 लाख रुपये उत्पन्न मिळाले.
advertisement
गणेशोत्सवाच्या दीड दिवसांच्या विसर्जनानंतर टप्प्याटप्प्याने कोकणातून परतीचा प्रवास सुरू झाला आहे. एसटीने परतीच्या प्रवाशांसाठी देखील विशेष नियोजन केले असून, प्रवाशांच्या सोयीसाठी बसेस वेळापत्रकानुसार चालविल्या जात आहेत.
या योजनेमुळे एसटीला केवळ आर्थिक उत्पन्न मिळाल नाही तर कोकणवासीयांच्या विश्वास आणि पसंतीतही वाढ झाली आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या प्रवास सुविधांनी भाविकांना आकर्षित करण्याचे उद्दिष्ट महामंडळाचे आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2025 12:25 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
St Bus : एसटी महामंडाळाला बाप्पा पावला; गणेशोत्सवानिमित्ताने केली तब्बल इतक्या कोंटीची कमाई


