Siddhivinayak Temple : भाविकांनो! 'या' तारखेपासून सिद्धीविनायक मंदिर राहणार 5 दिवस बंद,कारण..

Last Updated:

Siddhivinayak Temple : जर तुम्हीही येत्या काही दिवसांत दादरमधील प्रसिद्ध सिध्दिविनायक दर्शनासाठी जायचा विचार करत असाल तर आधी ही बातमी नक्की वाचा.

siddhivinayak temple
siddhivinayak temple
मुंबई : मुंबईतील दादर येथे असलेले श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर पुढील पाच दिवस भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे. देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही दररोज लाखो भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येतात. पण नेमक्या कोणत्या तारखेपासून हे मंदिर बंद असेल शिवाय याचे कारण काय आहे त्याबाबात सविस्तर जाणून घ्या.
गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाण्याआधी वाचा
सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार मंदिर बंद असण्याच्या काळात श्री गणेशाच्या मूर्तीवर सिंदूराचा लेप करण्यात येणार आहे. ही परंपरागत धार्मिक प्रक्रिया असल्यामुळे भाविकांना गाभाऱ्यातील मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही. मात्र मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी श्रींच्या छायाचित्राचे दर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ट्रस्टने भाविकांना आवाहन केले आहे की या कालावधीत दर्शनासाठी गर्दी टाळावी तसेच सहकार्य करावे. विशेष म्हणजे या पाच दिवसांत मंदिर परिसरात तुलनेने कमी गर्दी राहण्याची शक्यता असल्याचेही ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे.
advertisement
'या' दिवशी मंदिराचे दरवाजे बंद
मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार,7 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. सिंदूर लेपन विधी पूर्ण झाल्यानंतर 12 जानेवारी रोजी सकाळी विधीवत पूजा-अर्चा केली जाणार त्यानंतर दुपारी 1 वाजता मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात येईल. त्या दिवसापासून नेहमीप्रमाणे प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन सुरू होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Siddhivinayak Temple : भाविकांनो! 'या' तारखेपासून सिद्धीविनायक मंदिर राहणार 5 दिवस बंद,कारण..
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement