Mumbai News : मुंबईत नेमकं चाललय काय? बसण्याच्या जागेवरून वाद, दोन वृद्धांसोबत जे केलं ते धक्कादायक
Last Updated:
Malad News : मुंबईतील मालाडमध्ये बसण्याच्या जागेवरुन वादातून दोन वयोवृद्धांना एका तरुणाने मारहाण केली आहे. या घटनेने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.
मुंबई - मुंबईच्या मालाडमध्ये घडलेल्या एका घटनेने सर्वांना हादरुन सोडले आहे. जिथे मालाडमध्ये एका परिसरात बसण्याच्या अतिशय शुल्लक कारणांमुळे एका तरुणाने दोन वृद्धांना जोरदार मारहाण केलेली आहे. या घटनेते दोघ वृद्धांना गंभीर जखमा झालेल्या असून पोलिसांना तरुणाला अटक केलेली आहे.
advertisement
नेमके घडले काय?
मिळालेल्या माहितीनुसार,रविवार संध्याकाळी सातच्या सुमारास बहरजी बलीहारी कनोजिया (66) आणि त्यांचा मित्र राजनाथ यादव (67) त्यांच्या सोसायटीजवळील बाकावर बसले होते. दरम्यान त्यांच्या परिसरातील एक तरुण त्याच्या जवळ आला आणि त्याने त्यांना इकडे बसण्यास नाही सांगितले. या शुल्लक गोष्टीवरुन वाद वाढत गेला आणि त्यात रागाच्या भरात तरुणाने दोघांना मारहाण केली.
advertisement
घडलेल्या घटनेनंतर तरुणाने घटनास्थळावरुन पळ काढला. पण त्या वृद्ध व्यक्तींनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर तरुणाचा तपास सुरु करुन त्याला अटकही करण्यात आली. हल्ल्यात जखमी झालेले बहरजी आणि राजनाथ दोघेही सध्या उपचार घेत आहेत. पोलीसांनी हत्येचा प्रयत्न, शारिरिक हानी पोहोचवणे आणि इतर संबंधित कलमांतर्गत तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2025 3:00 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : मुंबईत नेमकं चाललय काय? बसण्याच्या जागेवरून वाद, दोन वृद्धांसोबत जे केलं ते धक्कादायक


