काही न करता तुम्हाला फुकटात जमीन कशी मिळाली? उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना सवाल

Last Updated:

पक्ष चोरले आता शेतकऱ्यांच्या जमिनी चोरतायत असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर केला आहे.

News18
News18
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारच्या १८०० कोटींच्या जमीनीच्या गैरव्यवहारानं राजकीय भूकंप आलाय. 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये हडप करण्याचा डाव उघडकीस आल्यानंतर सडकून टीका होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील दौऱ्यातील अखेरच्या दिवशी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. एवढच नाही तर अजित पवार यांच्या कर्जमाफीच्या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेतला आहे. काही न करता तुम्हाला फुकटात जमीन कशी मिळाली? पक्ष चोरले आता शेतकऱ्यांच्या जमिनी चोरतायत असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याच्या प्रतापांनी अवघा महाराष्ट्र स्तब्ध आहे. याप्रकरणी राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून संबंधित प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं नाव का घेण्यात आलं नाही त्याच्यावर गुन्हा का नोंद झाला नाही असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत होता. तुम्ही हात पाय न हलवता जमीन मिळाली ना तुम्हाला? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला आहे. शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवत आहेस. पक्ष चोरल्यानंतर हे सरकार अगोदर मत चोरी करून सत्तेत आलं आणि आता जमिनी सुद्धा चोरत असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला.
advertisement

कर्जमाफीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

कर्जमाफीवरून उद्धव ठाकरे म्हणाले, अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र सरकारने अद्याप भरपाई दिलेली नाही. अन्नदात्यालाच आता अन्न दिलं जातंय पण तेही सडलेले आणि किडलेलें. या सड़क्या आणि किडक्या तांदळाचे जेवण बनवून तहसीलदाराला खाऊ घाला, म्हणजे यांना तुमची किंमत कळेल.. गावामध्ये बोर्ड लागले पाहिजेत, कर्जमुक्ती नाही तोपर्यंत मत देणार नाही. तुम्ही माझ्याबरोबर बोलत आहेत ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. माझ्यापेक्षा 10 पाऊल पुढे जाणार मुख्यमंत्री असेल तर मी त्याचा जाहीर सत्कार करेन. मात्र, मदत काही मिळालेली नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काही न करता तुम्हाला फुकटात जमीन कशी मिळाली? उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना सवाल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement