Vegetable Market Price: कृषी बाजारामध्ये शेतीमालांना सर्वाधिक भाव; हळद, कांदा, मका आणि सोयाबीनला दर कसा ?

Last Updated:

Vegetable Market Price: शुक्रवार , दिनांक 3 ऑक्टोबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

+
कृषी

कृषी मार्केट

मुंबई: शुक्रवार , दिनांक 3 ऑक्टोबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आपण महत्त्वाच्या चार शेतमालांचे कृषी मार्केट जाणून घेऊ. यामध्ये हळद, कांदा, मका व सोयाबीनची आवक आणि भाव पाहू.
अशी राहिली कांद्याची आवक
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज कांद्याची तब्बल 12 लाख 7 हजार 163 क्विंटल इतकी एकूण आवक झाली. यापैकी सर्वाधिक आवक धुळे मार्केटमध्ये राहिली. धुळे मार्केटमध्ये झालेल्या 10 हजार 794 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण अकराशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये 82हजार 84 क्विंटल कांद्यांची आवक होऊन त्यास सर्वाधिक 1117 रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण भाव मिळाला. नागपूर मार्केटमध्ये सर्वात कमी कांद्यांची आवक होवून त्यास सर्वाधिक दोन हजार रुपये भाव मिळाला.
advertisement
मका- सांगली मार्केटमध्ये 250 क्विंटल मक्याची आवक झाली. त्यास सर्वाधिक सव्वीशे रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक भाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये मक्याची सर्वाधिक पंधराशे सहा क्विंटल आवक होऊन त्या सर्वसाधारण 1750 बाजारभाव मिळाला. राज्यात आज एकूण 5300 क्विंटल मक्याची आवक झाली.
हळद- राज्यात हळदीची एकूण आवक 2479 क्विंटल राहिली. सांगली मार्केटमध्ये 210 क्विंटल आवक झालेल्या राजापुरी हळदीस 11 हजार 500 रुपये भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये केवळ 1 क्विंटल हळदीची आवक होऊन त्यास सर्वाधिक 20 हजार 500 रुपये भाव मिळाला.
advertisement
सोयाबीन- राज्यात एकूण 19 हजार 208 क्विंटल सोयाबीनची आवक राहिली. जालना मार्केटमध्ये सर्वाधिक 6 हजार 90 क्विंटल सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. त्यास सर्वाधिक 3706 रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण भाव मिळाला. तर सर्वाधिक 4 हजार 475 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव नाशिक मार्केटमध्ये मिळाला. छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये केवळ 1 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास 4 हजार 150 रुपये बाजारभाव मिळाला.
मराठी बातम्या/मुंबई/
Vegetable Market Price: कृषी बाजारामध्ये शेतीमालांना सर्वाधिक भाव; हळद, कांदा, मका आणि सोयाबीनला दर कसा ?
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement