PM Narendra Modi : ...म्हणून त्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, PM मोदींचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Last Updated:

PM Narendra Modi : मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर महायुतीची जाहीर प्रचार सभा होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

News18
News18
मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात शेवटच्या टप्प्याचा प्रचार सुरू आहे. शनिवारी (18 मे) संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या सभेतून पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
शिवसेनेनं बाळासाहेबांना धोका दिला : मोदी
मोदी म्हणाले, बाबासाहेब ठाकरे हे पंचत्वात विलीन झाले. या शिवतीर्थावरून बाळासाहेबांचा आवाज घुमत होता. आज त्यांच्या आत्म्याला वेदना पोहोचत असतील. नकली शिवसेनेनं बाळासाहेबांना धोका दिला. शिवसैनिकांच्या बलिदानाला धोका दिला. राम मंदिराला शिव्या देणाऱ्यांसोबत गेले. सत्तेसाठी मुंबईवर हल्ल्यानंतर पार्टी करणाऱ्या लोकांसोबत गेले आहे. जो काँग्रेस सावरकरांना शिव्या देतो, त्यांच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसले आहे.
advertisement
शरद पवारांना पंतप्रधान मोदींचे चॅलेंज
मी शरद पवारांना चॅलेंज देतोय, तुम्ही राहुल गांधींकडून हे बोलून दाखवा, सावरकरांचा कधीच अपमान करणार नाही. आता त्यांचं तोंड बंद केलं आहे. मी आयुष्यभरात सावरकर यांच्याबद्दल चुकीचं बोलणार नाही, असं राहुल गांधी यांच्याकडून बोलून दाखवा. पण ते असं बोलणार नाही.
महाराष्ट्राच्या मातीसोबत यांनी धोका दिला आहे. तेव्हा एक काळ होता शिवसेनेची ओळखी ही घुसखोरांना पिटाळून लावणारी होती. पण आज त्यांना बौद्ध, जैन, शिख यांना आश्रय देण्यासाठी विरोध करत असतात. या आघाडीने पूर्ण देशाला धोका दिला आहे. ज्या कसाबने मुंबईत गोळीबार केला. त्याला ही लोक क्लिन चिट देत आहे. ज्या पाकिस्तानला जगात कुणी मानत नाही. सर्जिकल स्ट्राईक आणि एअरस्ट्राईकवर आघाडीचे लोक बोलत आहे. सैनिकांना ही लोक अपमान करत आहे.
advertisement
इंडिया आघाडीवाले हे बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करत आहे. त्यांचा अपमान करत आहे. यांनीच संविधानाला विरोध केला होता. धर्माच्या आधारावर आरक्षण नको असं बाबासाहेब म्हणाले होते. गरिबांच्या आरक्षणावर यांचा डोळा आहे. मी संपूर्ण देश फिरून आलोय, यावेळी निवडणुकीचा निकाल हा जुने सगळे रेकॉर्ड मोडणार आहे. देश हा एक महासत्ता म्हणून समोर येणार आहे, असं आश्वासन मोदी यांनी दिले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
PM Narendra Modi : ...म्हणून त्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, PM मोदींचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement