Uddhav Thackeray : '4 जूननंतर नोटाबंदीप्रमाणे तुम्ही फक्त..' उद्धव ठाकरेंचा PM मोदींविषयी मोठा दावा
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Uddhav Thackeray : मुंबईतील बीकेसी मैदावर आज इंडिया आघाडीची सभा पार पडली. या सभेतून उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आरोपांवर पलटवार केला आहे.
मुंबई : राज्यातील पाचव्या टप्प्यासाठी सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. शनिवारी (18 मे) संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. तर बांद्रा येथील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा पार पडत आहे. या सभेतून उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर सडकून टीका केली आहे.
ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना इशारा
उद्धव ठाकरे म्हणाले ही निवडणुकीची सांगता आणि विजयाची नांदी ठरणारी सभा आहे. आज मुंबईत दोन सभा होत आहेत. गद्दार आणि नकली उपस्थित असलेली भाडोत्री असलेली माणसे आहेत. वक्ते, उमेदवार, माणसे सुद्धा भाड्याने आणले आहेत. सगळे भाडखाऊ तिकडे आहेत. 4 जून पर्यंतचे पंतप्रधान बोलायला उभे राहिले आहेत. मी जरा अंदाज घेतला. 8 नोव्हेंबरला एका रात्रीत तुम्ही नोटाबंदी केली. आज मुंबईत आलाय बोलून घ्या 4 जूनला नंतर नोटाबंदीप्रमाणे तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल. चीन तिकडे आहे, त्यांच्यावर काही बोलत नाहीत. भाडोत्री घेऊन उद्धव ठाकरे संपवायला आले आहेत. मोदी तुम्ही संपवून बघा महाराष्ट्र तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा ठाकरेंनी दिला.
advertisement
ठाकरेंचा मोदींवर पलटवार
मोदी-शहांचा हा महाराष्ट्र होऊ देणार नाही, हा शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. सडलेली पाने आम्ही टाकून दिली. ती कचरा गोळा करणाऱ्याने तुमच्या गळ्यात टाकली आहे. कचरा गोळा करणारा पक्ष भाजप झाला आहे. मोदींना उन्माद चढला होता, चारशे पारचा नारा दिला होता आता सूर सापडत नाही. आम्ही अबकी बार तडीपार नारा दिला त्यांनी घराणेशाही काढली. माझे घराणे ज्या मातीत जन्माला आलो, त्या मातीत शिवाजी महाराज जन्माला आले. तुम्ही जिथे जन्माला तिथे औरंगजेब जन्माला आला आणि महाराष्ट्राच्या मातीत संपला. तुम्हाला पंतप्रधान करायला मी सामील होतो. तुम्ही पंतप्रधान झाल्यावर देश लुटायला चालला. तुम्हाला बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. तुम्ही पहिला हिंदूहृदयसम्राट शब्द म्हणायला शिका, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केला.
advertisement
मुंबईत होर्डिंग्ज कोसळून अनेकजण ठार झाले. त्यांचे रक्तही सुकले नाही तिथे ढोल बडवत रोड शो केला. जनता हुकूमशहाला गाडा म्हणत आहे. इंग्रजांच्या काळातही तरुण मुलांनी देशासाठी क्रांती केली. देश म्हणजे आहे तरी काय, भारत माता आहे कुठे? हिंदू मुस्लिम नाशिकच्या सभेत केले. शेतकऱ्यांनी कांद्याचे विचारले. मोदींची त्यावेळची नजर बघा, हुकूमशाहाची होती. तुम्ही त्यावेळी फक्त भारतमातेच्या घोषणा दिल्या. पंतप्रधान दगड धोंडा असेल देश नाही. तुम्ही असंवेदनशील झाले आहात. आमच्यासोबत मुस्लिम येत आहेत, हे त्यांना खुपते आहे. त्यामुळे मुस्लिमांवर आरोप करायचे. मोदी तुम्ही त्याग कधीच करायला हवा होता. मुस्लिमांना घुसखोर म्हणता, अशी टीका ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 17, 2024 9:30 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Uddhav Thackeray : '4 जूननंतर नोटाबंदीप्रमाणे तुम्ही फक्त..' उद्धव ठाकरेंचा PM मोदींविषयी मोठा दावा