मुंबईची मुलगी पब्जी खेळताना मुस्लिम तरुणाच्या प्रेमात पडली, धर्मांतर करून केलं, नंतर जे घडलं ते ऐकून अंगावर येईल शहारे!

Last Updated:

ती प्रेमात इतकी वेडी झाली की घर सोडून त्याच्यासोबत मुरादाबादला पळून आली. त्यानंतर धर्मांतर करत तिनं तिचं नाव झीनत फातिमा असं ठेवलं आणि...

News18
News18
मुंबई : ऑनलाइन गेम्समुळे गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मुंबईत ऑनलाइन गेममुळं एक वेगळंच प्रकरण घडलं. पब्जी खेळणारी एक तरुणी मुस्लिम युवकाच्या प्रेमात पडली. धर्म बदलून तिनं त्याच्याशी विवाह केला. पण पुढे भलतंच घडलं. या तरुणीनं काही कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातून ती वाचली पण कोमात गेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
advertisement
पब्जी खेळत असताना मुंबईतील एक तरुणी मुरादाबाद येथील मुस्लिम तरुणाच्या प्रेमात पडली. धर्मांतर करत तिनं मुरादाबादच्या फुझैलशी लग्न केलं. प्रेमाखातर हर्षदा झीनत फातिमा बनली. पती आणि त्याच्या कुटुंबीयांशी वाद झाल्याने तिनं टोकाचं पाऊल उचललं. त्यामुळे गंभीर अवस्थेत असलेल्या तरुणीला खासगी रुग्णालयात दाखल करावं लागलं. पोलिसांनी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून फुझैल आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर आयपीसी कलम 323,504,306,511 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एसपी (शहर) अखिलेश भदौरिया यांनी सांगितलं की,या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यातून सत्य समोर येईल. त्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
advertisement
मुंबईतील हर्षदा पब्जी खेळताखेळता मुरादाबादच्या फुझैलच्या प्रेमात पडली. ती प्रेमात इतकी वेडी झाली की घर सोडून त्याच्यासोबत मुरादाबादला पळून आली. त्यानंतर धर्मांतर करत तिनं तिचं नाव झीनत फातिमा असं ठेवलं आणि फुझैलशी निकाह केला. त्यानंतर हे दोघे मुरादाबादमधील गलशहीद पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका भाडेतत्त्वावरील घरात राहू लागले. काही दिवसांत प्रेमाचं भूत उतरलं आणि दोघांमध्ये वाद सुरू झाले. वादाला कंटाळून एके दिवशी हर्षदा उर्फ झीनतनं गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पण सुदैवाने ती त्यातून बचावली. सध्या ती रुग्णालयात उपचार घेत असून,मृत्यूचा सामना करत आहे.
advertisement
मुरादाबाद येथील एका खासगी रुग्णालयातील आयसीयूत ती व्हेंटिलेटरवर आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. मयंक यांनी सांगितले की,तिची प्रकृती गंभीर आहे. ती कोमातून बाहेर आलेली असली तरी शुद्धीत नाही. त्यामुळे ती कधी बरी होईल हे स्पष्टपणे सांगता येत नाही.
पीडितेची आई माधुरी मिश्रा यांनी सांगितलं की, 'आम्ही मुंबईतील घाटकोपर येथे राहतो. हर्षदाने पहिल्या लग्नानंतर घटस्फोट घेतला आहे. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये होती. त्याचदरम्यान ती पब्जी खेळू लागली. पब्जीच्या नादात ती मोहम्मद फुझैलच्या संपर्कात आली. फुझैलनं तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी मैत्री केली. ती एका इव्हेंट कंपनीत जॉब करत होती. त्यामुळे ती त्याच्या जाळ्यात अडकली. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. आम्ही तिला एक महिना खूप समजावलं. त्याच्याशी असलेली मैत्री तोडण्यास सांगितले पण तिनं आमचं ऐकलं नाही. एक दिवस घर सोडून ती त्याच्यासोबत निघून गेली.'
advertisement
'त्यानंतर हर्षदा फुझैल सोबत ट्रेनमध्ये बसून मुरादाबादला गेली. तिथं 28 मार्चला तिनं धर्मांतर करत निकाह केला. या जबरदस्तीने केलेल्या विवाहानंतर चार दिवसांनी फुझैलनं मला फोन करून सांगितलं की झीनतनं गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पण टेन्शनची गरज नाही,ती आता बरी होत आहे,'असं पीडितेच्या आईनं सांगितलं. घटनेची माहिती मिळताच पीडितेची आई मुंबईहून मुरादाबादला आली असता आपली मुलगी कोमात असल्याचे पाहिले. तुम्हाला तुमच्या मुलीला घरी घेऊन जायचे असेल तर आमची हरकत नाही,असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर मुरादाबाद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. फुझैल मुंबईतील रेड लाइट एरियात जेवण पोहोचवण्याचे काम करतो. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
advertisement
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईची मुलगी पब्जी खेळताना मुस्लिम तरुणाच्या प्रेमात पडली, धर्मांतर करून केलं, नंतर जे घडलं ते ऐकून अंगावर येईल शहारे!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement