VIDEO: वरळीत तुफान राडा! शिंदेंच्या कार्यकर्त्याला मनसैनिकांनी चोप चोप चोपला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
Maharashtra assembly election 2024: महाराष्ट्रात आज विधानसमेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडतेय. या मतदानाच्याच दिवशी वरळीत तुफान राडा झालाय. वरळीत मनसेचे कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की होऊन तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे.
प्रणाली कापसे, मुंबई : महाराष्ट्रात आज विधानसमेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडतेय. या मतदानाच्याच दिवशी वरळीत तुफान राडा झालाय. वरळीत मनसेचे कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की होऊन तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये मनसैनिकांनी शिंदेंच्या कार्यकर्त्याला धु धु धुतलाय. या राड्यामागच कारण एक व्हायरल पत्र ठरलंय. या प्रकरणी वरळी विधानसभेचे उमेदवार संदिप देशपांडे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
वरळी मतदार संघात एक पत्र व्हायरल होत आहे.शिंदे गटाचा कार्यकर्ता हे पत्र व्हायरल करत असल्याचा आरोप मनसेचा आहे. या पत्रात शिंदे गटाचे उमेदवार यांना राज ठाकरे पांठिबा देत असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र हे पत्र बनावट असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे. तसेच या प्रकरणी संदीप देशपांडे आग्रापाडा पोलिस ठाणे गाठले असून ते तक्रार दाखल करणार आहेत.
advertisement
दरम्यान शिवसेनेच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा असे फेकपत्र वरळीमधील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी वरळी मध्ये वाटप केल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली आहे. त्याचसोबत या घटनेचा त्याला जाब देखील विचारला आहे. या घटनेने वरळी विधानसभा मतदार संघात तणाव निर्माण झाला आहे.
पराभवाच्या भीतीने विरोधकांनी वरळीत अपप्रचार सुरु केला आहे, तो श्री. संदीप देशपांडे यांनी उघडकीस आणला.#worli #Vidhansabha2024 pic.twitter.com/esPqwgQ3Qw
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 20, 2024
advertisement
पराभवाच्या भीतीने विरोधकांनी वरळीत अपप्रचार सुरु केला आहे, असा आरोप आता संदीप देशपांडे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर केला आहे.
शिंदे गटाला माहिममध्ये कुठलाही पाठिंबा दिला नाही. आणि माहिममधून पाठिंबा दिल्याचे कोणतेही पत्रक काढले नसल्याचे राज ठाकरे यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2024 10:46 AM IST


