Sanjay Raut On Supriya Sule: संजय राऊतांनी सुप्रिया सुळेंना सुनावले खडे बोल, कोणत्या मुद्यावरून संतापले?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sanjay Raut On Supriya Sule : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. मात्र, आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना सुनावले.
मुंबई: महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राज्यातील वातावरण तापू लागले आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून आता युती-आघाडीसाठीच्या जोरबैठकांना जोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. मात्र, आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना सुनावले.
संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकीच्या मुद्यावर भाष्य केले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र आल्याने उत्सह आहे. या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत, असेही राऊत यांनी सांगितले. मराठी अस्मितेची शेवटची लढाई आहे. मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाने उतरावं असं आवाहनही त्यांनी केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. मुंबई, पुणे, कल्याण डोंबिवली, ठाणे आदी महापालिकांमध्ये उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. इतर ठिकाणी स्थानिक पदाधिकारी निर्णय घेणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
advertisement
सुप्रिया सुळेंना खडे बोल सुनावले...
काही दिवसांपूर्वी संसदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएमवर आपण शंका घेणार नसल्याचे म्हटले होते. मी स्वत: ४ वेळेस ईव्हीएमने झालेल्या मतदानावर विजयी झाले. त्यामुळे आपण बोलणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
संजय राऊत यांनी म्हटले की, ईव्हीएममध्ये घोटाळे आहेत. सुरुवातीच्या काळात सुप्रिया सुळे देखील ईव्हीएम विरोधात होत्या. सोयीनुसार भूमिका घेता येत नाही आणि बदलता येत नाही. भूमिकेवर ठाम राहायलं हवं. ईव्हीएममध्ये घोटाळे आहेत, राहुल गांधी यांनी दाखवून दिले आहे. लोकांच्या मनात संभ्रम तयार होईल आणि संघर्षाची धार कमी होईल अशा भूमिका घेऊ नयेत. सत्य आम्हाला माहीत आहे, सत्याची लढाई अशी भरकटली जावू नये, असे संजय राऊत यांनी म्हटले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2025 11:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut On Supriya Sule: संजय राऊतांनी सुप्रिया सुळेंना सुनावले खडे बोल, कोणत्या मुद्यावरून संतापले?









