चिअर्स! तळीरामांसाठी खूशखबर, वाईन शॅापच्या वेळेत बदल, महायुती सरकारकडून वेळापत्रक जाहीर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
ख्रिसमस आणि थर्टी फस्टच्या निमित्ताने राज्यातील दारूची दुकाने, पब आणि बार यांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Maharashtra Liquor Sale Update : नवीन वर्ष आणि नाताळ या दोन्ही दिवशी दारू पिणाऱ्यांची संख्या वाढते. अशा मद्यप्रेमींसाठी आता सरकारने चिअर्स केलं आहे. नवीन वर्ष आणि नाताळनिमित्ताने राज्यातील दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता लक्षात घेऊन परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे
अनेकजण मद्य पिऊन नव वर्षाचे स्वागत करत असतात. या काळात सर्वाधिक मद्यविक्री होते. 24, 25 आणि 31 डिसेंबर रोजी पहाटेपर्यंत दारू मिळणार आहे. बीअर/ वाइन विकणाऱ्या दुकानांना मध्यरात्री 1 वाजेपर्यंत विक्रीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. FLBR-II परवानाधारकांसाठीही अशीच मुदतवाढ देण्यात आली. ख्रिसमस आणि थर्टी फस्टच्या निमित्ताने राज्यातील दारूची दुकाने, पब आणि बार यांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृह विभागाने याबाबतचे महत्त्वाचे आदेशही जारी करण्यात आलेत.
advertisement
राज्य सरकारकडून परिपत्रक जारी
गृह विभागाच्या आदेशानुसार, 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर असे तीन दिवस दारूची दुकानाची वेळ वाढवण्यात आली आहे. दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर पब आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारी परवान्यानुसार दारूची दुकाने सुरू ठेवण्याबाबत राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
advertisement
एफएल-३ (परवाना कक्ष) आणि एफएल-४ (क्लब अनुज्ञप्ती परवानगी असणाऱ्या पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 1.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत आणि पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री
11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत सूट देण्यात येणार आहे. नमुना ई (बिअर बार), ई-2 परवानगी असणाऱ्या रात्री 12 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 पर्यंत परवानगी असणार आहे.
advertisement
नवीन वर्षाच्या स्वागतवेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त
24, 25 डिसेंबर आणि थर्टी फस्ट हे तीन दिवस सर्वजण सेलिब्रेशन करतात. पण या काळात बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांची दमछाक होते. नवीन वर्षाच्या स्वागतवेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.
31 डिसेंबर रोजी गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिस चोख बंदोबस्त ठेवणार आहे. तसेच अवैध दारू विक्रीवर चाप बसवण्यासाठी राज्य उत्पादन शुक्ल विभागाची पथके तैणात होतील. रात्रीच्या गस्त, अनधिकृत ढाबे, फार्म हाऊस तसेच संशयित गाड्यांची तपासणी पोलिसांकडून होईल. वाहतूक विभागाकडून ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह ची विशेष मोहिम राबवली जाणार आहे. सावर्जनिक ठिकाणी गोंधळ घालणे, महिलांशी गैरवर्तवणूक, अनधिकृत मद्य विक्री, अंमली पदार्थ विक्री/सेवन यांवर कडक करवाई केली जाणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 9:19 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
चिअर्स! तळीरामांसाठी खूशखबर, वाईन शॅापच्या वेळेत बदल, महायुती सरकारकडून वेळापत्रक जाहीर










